महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांपैकी एक पुलं देशपांडे (Purushottam Laxman Deshpande)! आज पु ल देशपांडे यांचा 20 वा स्मृतिदिन आहे. या दिवसाच्या निमित्ताने 'बी बिरबल' या पुण्यातील संस्थेने खास PuLa100 फॉन्ट लॉन्च केला आहे. त्यामुळे पुलंवर प्रेम करणार्या त्यांच्या अनेक चाहत्यांना पुलं देशपांडे यांच्या हस्ताक्षरामध्ये आता डिजिटल फॉन्ट वापरता येणार आहे. दरम्यान www.bebirbal.in/pula100 या संकेतस्थळावर तो मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध देखील करण्यात आला आहे. PL Deshpande Death Anniversary: पु.ल.देशपांडे यांचे जीवनाचे मार्गदर्शन करणारे विचार ज्यांना वाचून एक हसू येऊन तुम्हाला मिळेल जीवनाची शिकवण.
कसा डाऊनलोड करा हा फॉन्ट?
- www.bebirbal.in/pula100 वर क्लिक करा.
- तुम्हांला तुमचा इमेल येथे द्यायचा आहे.
- तुम्ही दिलेल्या इमेल अॅड्रेसवर pula100 हा फॉन्ट मिळेल.
- तो डाऊनलोड करा. आणि फाईल सेट अप करा.
- तुम्हांला तुमच्या डिव्हाईजमध्ये हा फॉन्ट वापरता येईल.‘आयुका’चे निरंजन अभ्यंकर आणि फॉन्टतज्ज्ञ किमया गांधी,डॉ. दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर यांनी हा पुल 100 फॉन्ट बनवण्याचं काम केलं आहे. सुमारे दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर हा फॉन्ट तयार झाला आहे.
सध्या पुलं देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. पुलं देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 साली झाला. पुलं देशपांडे हे लेखक, नाटककार, कथाकथनकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक आणि पेशाने प्राध्यापकही होते. अनेक अनेक प्रवासवर्णनं, विनोदी लेखन आजही रसिकांना खळखळून हसवते.