PUBG Mobile India आज लॉन्च होण्याची शक्यता; FAU-G पेक्षा मिळाले अधिक प्री-रजिस्ट्रेशन
PUBG Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India)

पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) आज लॉन्च होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. पबजी मोबाईल इंडियाची वेबसाईट देखील सज्ज आहे. तसंच कंपनीने अलिकडेच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गेमचा टीझर व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान, रिपोर्टनुसार, आज (शुक्रवार, 20 नोव्हेंबर) रोजी पबजी गेम लॉन्च असल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पबजी मोबाईल गेम (PUBG Mobile Game) पेक्षा पबजी मोबाईल इंडिया काहीशा वेगळ्या स्वरुपात लॉन्च करण्यात येणार आहे.

पबजी मोबाईल गेम युजर्सच्या डेटा सुरक्षिततेचे कारण देत भारतात बॅन करण्यात आला होता. त्यासोबत 117 चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. (PUBG Mobile India लवकरच होणार लॉन्च; कंपनीने शेअर केला टीझर, Watch Video)

पबजी मोबाईल इंडियाचे प्री-रजिस्ट्रेशन युजर्ससाठी खुले करण्यात आले आहे. टॅपटॅप गेम फोरर्मसच्या माध्यमातून युजर्स यात सहभागी होऊ शकतात. नव्या रिपोर्टनुसार, पबजी मोबाईल इंडिया ने प्री-रजिस्ट्रेशनसाठी आतापर्यंत 200,000 एन्ट्रीज आल्या आहेत. ही संख्या FAU-G गेमच्या तुलनेत अधिक आहे. FAU-G गेमला आतापर्यंत केवळ 60,000 एन्ट्रीज मिळाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by PUBG MOBILE INDIA (@pubgmobile_in)

PUBG Mobile India (Photo Credits: File Image)

प्री-रजिस्ट्रेशन सुरु झाल्याने पबजी मोबाईल इंडियाचे फेसबुक आणि युट्युब पेज देखील लाईव्ह झाल्याचे स्पष्ट होते. मात्र प्री-रजिस्ट्रेशन बंद झाल्याने गेम लवकरच लॉन्च होईल, असे बोलले जात आहे. गेमचा टीझर लॉन्च झाला असून प्री-रिजस्ट्रेशन बंद होणे हे लॉन्चिंगचे संकेत आहेत का? हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, नव्याने लॉन्च होणाऱ्या पबजी मोबाईल गेमला भारतीय युजर्स कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.