PUBG Lite युजर्ससाठी वाईट बातमी! येत्या 29 एप्रिलला गेम होणार बंद
PUBG | Image used for representational purpose only | (Photo Credits: Flickr)

PUBG म्हणजेच PlayerUnkown Battlegrounds चे विविध वर्जन आहेत. हा गेम हाय-अॅन्ड स्मार्टफोन आणि कंप्युटर ते लो-अॅन्ड डिवाइसेससाठी उपलब्ध करुन दिला गेला आहे. Battle Royale जनेरचा हा गेम जगभरात पसंद केला जात आहे. गेमिंगच्या जगात PUBG ते PUBG Mobile Lite युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. दरम्यान याचे एक वर्जन आता लवकरच बंद होण्याचा मार्गावर आहे. त्याबद्दल कंपनीने अधिकृत घोषणा सुद्धा केली आहे.(भारतामध्ये PUBG Mobile India पुन्हा लॉन्च होणार? मेकर्सनी सुरु केल्या हालचाली, Investment and Strategy Analyst पदासाठी होत आहे भरती)

एप्रिल महिन्याच्या अखेरीस पबजी लाइट वर्जन बंद होणार आहे. हे फ्री-टू प्ले वर्जन लोअर अॅन्ड मशीनसाठी लॉन्च करण्यात आला होता. जो आता येत्या 29 एप्रिलला बंद होणार आहे. कंपनीने याचे नवे डाऊनलोड 30 मार्चलाच बंद केले आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी गेम पब्लिशर Krafton याने एक नोट लिहिली आहे. परंतु हा गेम नेमका कोणत्या कारणामुळे बंद केला जात आहे याबद्दल स्पष्ट झालेले नाही.

कंपनीने PUBG Lite च्या वेबसाइटवर लिहिले आहे की, आम्ही PUBG Lite चाहत्यांनी केलेल्या सपोर्टसाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. कोरोनाच्या काळात पबजी लाइटने चाहत्यांचे मनोरंजन केले आणि सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने एक मजेशीर साधन गेम स्वरुपात उपलब्ध करुन दिले. मात्र आम्ही एक मुश्किल निर्णय घेतला आहे. आम्ही खुप विचार केल्यानंतर पबजी लाइट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला याबद्दल सांगताना आम्हाला दु:ख होत आहे की, पजबी लाइटची सेवा 29 एप्रिल 2021 पासून बंद होणार आहे.(FAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड?)

दरम्यान, गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात पब्लिशर Krafton ने पबजी लाइट पू्र्णपणे Free to play केला होता. कंपनीने त्याचवेळी इन-गेम-करेंसी सिस्टिम बंद करत हे वर्जन हटवले. हा गेम जानेवारी 2019 मध्ये थायलंड मध्ये बीटा वर्जनमध्ये आला होता. त्यानंतर गेम ऑक्टोंबर 2019 मध्ये युरोपात लॉन्च केला गेला. एप्रिल 2021 मध्ये आता या गेमचा प्रवास संपत आहे.