पॉर्न साईट (Porn Sites Ban) वरील बंदीला धाब्यावर बसवत पॉर्नहब (Pornhub) व रेडट्यूब (Redtube) या कंपन्यांनी नाव बदलून आपल्या व्यवसाय सुरु ठेवल्याचे नुकतेच उघड झाले आहे. यामुळे भारतात या साईट्सचा अगदी उघडपणे बिनधास्त वापर होत आहे. दोन वर्षांपूर्वी भारताच्या दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या सर्व परवानाधारक कंपनीना पॉर्न साईट्स बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या भाग 79(3)(b) व संविधानातील कलम 19(2) अंतर्गत या साईट्सवरील सामग्री ही नैतिक भंग करणारी असल्याचे देखील सांगत तब्बल 857 साईट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या. यामध्ये पॉर्न हब व रेडट्यूबचा देखील समावेश होता, पण या साईट्सनी चलाखीने नावात बदल करून नियम तोडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पॉर्न हब आणि रेडट्यूब या साईट्सने आपले मूळ नाव तसेच ठेवता त्यामागे '.com' ऐवजी अनुक्रमे '.org' व '.net' लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दोन्ही वेबसाईट्स pornhub.org आणि redtube.net या नावाने वापरता येऊ लागल्या. इंटरनेट प्रणाली मध्ये .net हे डोमेन सहसा नेटवर्किंग संबंधित वेबसाईटला वापरण्यात येते तर .'org' हे डोमेन विना नफा संस्थांच्या सुविधेसाठी आहे. साहजिकच यामुळे या दोन्ही वेबसाइटना व्यवसायात अधिकृत अडचण आली नाही.
Child Porn पाहण्यासंबंधित इमेलच्या माध्यमातून धमकी देत युजर्सकडून पैशांची लूट
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यावर सायबर लॉ तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी भारतात कठोर नियमावलीची आवश्यकता असल्याचे सांगितले, लहान मुलांची पोर्नोग्राफी करणे, सेक्सटिंग यासारख्या कारणातून अनेक सायबर गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे हे थांबवण्याकरिता काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे असेही दुग्गल यांनी म्हंटले आहे.