Poco X3 (Photo Credits: Twitter)

अल्पावधीत भारतात लोकप्रिय झालेली Poco कंपनी लवकरच आपला एक नवा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. येत्या 22 सप्टेंबरला भारतात Poco चा नवा स्मार्टफोन Poco X3 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. Poco India ने ट्विटरच्या माध्यमातून याबाबात माहिती दिली असून भारतात दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच होईल. यासंबंधीची माहिती देताना पोकोने ट्विटरवर एक टिजर देखील प्रदर्शित केला आहे. या टिजरमध्ये फोनचा फ्रंट (Front) आणि बॅक पॅनल(Back Panel) दिसत आहे. ज्यात सेल्फी कॅमे-यासाठी होल-पंच डिझाईन आणि मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप असल्याची माहिती मिळत आहे.

अलीकडेच एका टिप्सटरने असा दावा केला होता Poco X3 ची भारतातील किंमत 19,000 ते 20,000 च्या दरम्यान असू शकते. युरोपमध्ये मागील आठवड्ता Poco X3 NFC लाँच केला होता. त्याच्या 6GB+64GB स्टोरेज आणि 6GB+128GB स्टोरेजची किंमत क्रमश: 229 यूरो (जवळपास 19,900 रुपये) व 269 यूरो (जवळपास 23,400 रुपये इतकी आहे. Poco M2 Pro अखेर भारतात लाँच; जबरदस्त कॅमेरा फिचर्स आणि बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये

याची किंमत लीक करणा-या टिप्सटरने असाही दावा केला आहे की, यातील बॅटरी थोडी मोठी असू शकते. Poco X3 चा भारतीय वेरियंट 8GB रॅम चा असू शकतो.

अलीकडेच पोकोने आपला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ( Poco M2 Smartphones Price ) 10,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत 64जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. इतर मॉडेल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज इतका आहे. ज्याची किंमत 12,499 रुपये आहे.