Poco C3 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको (Poco) भारतात लवकरच आपला नवा स्मार्टफोन Poco C3 आणण्याच्या तयारीत आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा स्मार्टफोन लाँच होणार असून या कंपनीने ट्विटच्या (Tweet) माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. पोको इंडियाने (Poco India) ट्विटरवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यात या फोनच्या आकर्षक आणि तितक्याच खास वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. या स्मार्टफोनचे लाँचिंग ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) दुपारी 12 वाजता पाहू शकता. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा ट्रिपल रियर कॅमेरा (Rear Camera) सेटअप दिला आहे.

Poco India ने शेअर केलेल्या ट्विटनुसार या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात MediaTek Helio G35 चिपसेट असू शकते. हा अॅनड्रॉईड 10 वर आधारित MIUI 12 सह येऊ शकतो. यात 4GB रॅम आणि 64GB चे स्टोरेज असू शकते. याची किंमत 10,000 ते 12,000 च्या मध्ये असू शकते. WhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद सुरक्षित

या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 13MP चा प्रायमरी कॅमेरासह मॅक्रो शूटर आणि डेप्थ सेंसर असेल. तर 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यात USB Type C चार्जिंग पोर्ट असू शकते.

काही दिवसांपूर्वी भारतात Poco X3 स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन 3 वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात प्रत्येक 2 रंग उपलब्ध आहेत. यात 6GB रॅम (RAM) आणि 64GB स्टोरेजची (Storage) किंमत 16,999 रुपये, 6GB+128GB ची किंमत 18,999 रुपये आणि 8GB+128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे.