सध्या सोशल मिडियाचा लोकांवर इतका प्रभाव वाढत चालला आहे आपल्या मनातील भावना, आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केला जातो. त्यात फेसबुक, ट्विटर हे अग्रस्थानी आहेत. यांचा वापर अनेक सामाजिक कार्यांसाठी, सणांसाठी इतकेच काय निवडणुकांसाठी केला गेला. यात ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवर 2019 हे वर्ष 'लोकसभा इलेक्शन 2019' हे हॅशटॅग खूप गाजले. तर ट्विटच्या बाबतीत सर्वाधिक लोकप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा अव्वल स्थानी आले आहेत.
नरेंद्र मोदींच्या एका ट्विटला 'गोल्डन ट्विट ऑफ द ईअर' बनण्याचा मान पटकावला आहे. लोकसभा निवडणूक 2019 जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले 'सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत' हे टि्वट या वर्षाचे 'गोल्डन ट्विट' ठरले आहे. या ट्विटला 1 लाख 17 हजार 100 रीटि्वट, तर तब्बल 4 लाख 20 हजार लाइक्स मिळाले.
तर दुसरीकडे क्रिडी विश्वात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे रिट्विट झाले आहे. तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडने आपले अव्वल स्थान कायम ठेवले.
विराट कोहलीच्या टि्वटला 45 हजार 100 रीटि्वट आणि 4 लाख 12 हजार लाइक्स मिळाले. 'लोकसभा निवडणूक' आणि 'चांद्रयान 2' सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर 'पुलवामा', 'आर्टीकल 370' हे विषयही ट्रेंडिंग राहिले.
ट्विटरच्या अहवालानुसार, महिलांची देखील वेगळी यादी तयार करण्यात आली. त्यात राजकाणातील महिलांमध्ये स्मृती इराणी सर्वाधिक लोकप्रिय असून दुसऱ्या स्थानावर प्रियंका गांधी वड्रा आहेत. तर मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक फॉलोअर्स असून त्या खालोखाल अनुष्का शर्माचा नंबर लागतो.