Google Doc (Photo Credits-Twitter)

गुगल डॉक (Google Doc) हे सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या ऑनलाईन वर्ड प्रोसेसर पैकी एक आहे. याचा वापर डॉक्युमेंट्स एडिट किंवा तयार करण्यासाठी केला जातो. मात्र अद्याप काही युजर्सला माहिती नाही की, कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या गुगल डॉक्समध्ये PDF फाइल एडिट केली जाऊ शकते. तर जाणून घ्या तुम्ही गुगल डॉकच्या मदतीने आपली पीडीएफ फाइल कशी एडिट करु शकता.(तुमचा Email-Id किंवा मोबाईल क्रमांक डेटा लीक झालेल्या यादीत आहे? 'या' पद्धतीने तपासून पहा)

यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल ड्राइव्हला भेट द्यावी लागणार आहे. तेथे अपलोड आयकॉनचा वापर करुन आपली पीडीएफ फाइल अपलोड करावी लागणार आहे, आता गुगल डॉकमध्ये अपलोड करण्यात आलेली पीडीएफ सुरु करा. आता पीडीएफवर राइट क्लिक करावे लागणार आहे. आता गुगल डॉकच्या माध्यमातून ती सुरु होईल.(फोनमधील Conatcs डिलिट झाले आहेत? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिस्टोर)

आता सोप्प्या पद्धतीने तुम्हाला पीडीएफ गुगल डॉकमध्ये एडिट करता येणार आहे. एडिट केल्यानंतर तुम्ही ती पीडीएफ फइल पुन्हा सेव्ह करु शकता. महत्वाची बाब म्हणजे तुमच्या सर्व पीडीएफ फाइल गुगलमध्ये सुरु होतील. दुसरी गोष्ट म्हणजे पीडीएफ फाइलचे फॉरमॅटिंग आणि इमेज थोडी वेगळी असू शकते.

तर गुगलने त्यांची Google Photos ही 1 जून 2021 पासून त्यांच्या अनलिमिटेड फोटो स्टोरेजच्या मोफत सुविधेला बंद केली आहे. दरम्यान याबबतची घोषणा त्यांनी मागील वर्षीच केली होती. आता गूगलच्या नव्या नियमावलीनुसार, गुगल अकाऊंट सोबत 15 जीबी फ्री स्टोरेज असेल. त्यामध्येच गूगल फोटोजचा समावेश असेल. त्यामुळे आता तुम्हांला 15 जीबी पेक्षा अधिकचे स्टोअरेज हवे असल्यास तुम्हांला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.