Paytm करणार भारतातील मिनी अॅप डेव्हलपर्संना मदत; 10 कोटींच्या निधीची तरतूद
Paytm Announces Rs 10 Crore Fund for Mini App Developers in India (Photo Credits: IANS)

डिजिटल पेमेंट (Digital Payment) अॅप पेटीएम (Paytm) ने देशातील मिनी अॅप डेव्हलपर्ससाठी (Mini App Developers) 10 कोटींची मदत करण्याची घोषणा केली आहे. गुगल मार्फत 30% चार्जेसला बळी पडणाऱ्या कमीत कमी 10 लाख मिनी अॅप्सना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मिनी अॅप डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये पेटीएम फाऊंडर विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी दिली. (Mini App Store: Google ला टक्कर देण्यासाठी Paytm ची नवी खेळी; बाजारात आणले मिनी अ‍ॅप स्टोअर, जाणून घ्या वैशिष्ट्ये)

गुगलने प्ले स्टोअरची नवी बिलिंग पॉलिसी लागू केल्यानंतर डेव्हलपर्सकडून गुगलवर टीका करण्यात येत आहे. परंतु, प्ले स्टोअर बिलिंग स्टिटमचे पेमेंट करण्यासाठी पर्यायी पेमेंट सिस्टमचा वापर करणाऱ्या भारतीय डेव्हलपर्ससाठी पेमेंट करण्याची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती गुगलकडून सोमवारी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच पेटीएम हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले होते. तेव्हापासून पेटीएम-गुगलचा वाद सुरु झाला आहे. त्यानंतर पेटीएमने अॅनरॉईड मीनी अॅप स्टोअर लॉन्च केले. याद्वारे स्थानिक डेव्हलपर्संना आपले प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहचवता येतील. मिनी अॅप म्हणजे कस्टम बिल्ड मोबाईल वेबसाईट. याद्वारे युजर्स अॅप डाऊनलोड न करता याचा वापर करु शकतात. (Paytm Android App Available on Google Play Store: पेटीएम अॅप डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा गुगल प्ले स्टोरवर झाले उपलब्ध)

18 सप्टेंबर रोजी गॅमलिंग पॉलिसीच्या (Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्याने गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हे अॅप्स हटवण्यात आले होते. मात्र काही वेळाने Paytm App पुन्हा डाऊनलोडिंगसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले. त्या दरम्यान युजर्सचे पैसे सुरक्षित असल्याचे पेटीएमकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, पॉलिसीचे उल्लंघन झाल्यानंतर अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात येते आणि अॅपचे अपडेटेड व्हर्जन येत नाही तोपर्यंत ते अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होत नाही.