Paytm Android App Available on Google Play Store: पेटीएम अॅप डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा गुगल प्ले स्टोरवर झाले उपलब्ध
Paytm (Photo Credits: IANS)

नोटाबंदी आणि त्यानंतर आलेले लॉकडाऊन यामुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहार (Digital Transaction) अगदी तेजीत सुरु आहेत. त्यामुळे लोकांनी Paytm, GPay, PhonePe यांसारख्या अॅप्सच्या मदतीने मोबाईलच्या एका क्लिकवर हे डिजिटल व्यवहार अगदी सोपे झाले. यामुळे लोकांना खिशात रोज जास्तीचे पैसे ठेवणे यापासून मुक्तता झाली. मात्र आज Paytm मध्ये गॅमलिंग पॉलिसीच्या Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हटवण्यात आले होते. मात्र काही वेळाने पेटीएम कंपनीने हे काही वेळासाठी हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र ANI ने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, आता हा अॅप गुगल प्ले स्टोरवर डाऊनलोडिंगसाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे अशी माहिती मिळत आहे.

गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हटवण्यात आला आहे. गैंबलिंग पॉलिसीच्या (Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे One97 Communications Ltd कंपनीचे हे अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नव्हते. मात्र आता हा अॅप गुगल प्ले स्टोरवर पुन्हा उपलब्ध करण्यात आला आहे. Paytm and Paytm First Games Pulled down from Google Playstore: पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवले; गैंबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी केली कारवाई

जेव्हा अॅपकडून पॉलिसीचे उल्लंघन होते तेव्हा आम्ही डेव्हलपर्संना याबद्दल सूचित करतो आणि अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो. जो पर्यंत डेव्हलपर्सकडून या अॅपचे अपडेटेड व्हर्जन येत नाही तोपर्यंत ते अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होत नाही. वारंवार पॉलिसीचे उल्लंघन झाल्यास त्या गुगल प्ले स्टोअर डेव्हलपरचे अकाऊंट निलंबित देखील केले जाऊ शकते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

गुगलच्या पॉलिसीनुसार, युजर्सला एका अॅप मधून दुसऱ्या अॅपमध्ये रिडिरेक्ट करणे चुकीचे आहे, यापूर्वी आरोग्य सेतू अॅपचा अॅड बॅनर वापरल्यामुळे Mobikwik या अॅप देखील गुगल प्ले स्टोअर वरुन हटवण्यात आले होते.