Paytm and Paytm First Games Pulled down from Google Playstore: पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवले; गैंबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी केली कारवाई
Paytm (Photo Credits: IANS)

गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Playstore) पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Games) हटवण्यात आला आहे. गैंबलिंग पॉलिसीच्या (Gambling Policies) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे One97 Communications Ltd कंपनीचे हे अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, गुगलने काही दिवसांपूर्वी याबद्दल पेटीएमला कळवले होते. तसंच या मुद्द्यावरुन कंपनीसोबत चर्चा देखील केली जात होती. मात्र पेटीएम अॅप सोबत लिंक असलेले Paytm for business, Paytm money, Paytm Mall आणि इतर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

"आम्ही कॅसिनो किंवा बेटींगला परवानगी देत नाही. एखादे अॅप युजर्सला बाहेरील अशा वेबसाईटवर रिडायरेक्ट करत असेल जिथे युजर्स पेड टुर्नामेंटमध्ये सहभाग घेऊन पैसे किंवा कॅश प्राईझ जिंकू शकतात. हे आमच्या नियमांत बसत नाही," असे अॅनरॉईड सिक्युरीटी आणि प्रायव्हसीचे उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.

पहा ट्विट:

जेव्हा अॅपकडून पॉलिसीचे उल्लंघन होते तेव्हा आम्ही डेव्हलपर्संना याबद्दल सूचित करतो आणि अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो. जो पर्यंत डेव्हलपर्सकडून या अॅपचे अपडेटेड व्हर्जन येत नाही तोपर्यंत ते अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होत नाही. वारंवार पॉलिसीचे उल्लंघन झाल्यास त्या गुगल प्ले स्टोअर डेव्हलपरचे अकाऊंट निलंबित देखील केले जाऊ शकते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

गुगलच्या पॉलिसीनुसार, युजर्सला एका अॅप मधून दुसऱ्या अॅपमध्ये रिडिरेक्ट करणे चुकीचे आहे, यापूर्वी आरोग्य सेतू अॅपचा अॅड बॅनर वापरल्यामुळे Mobikwik  या अॅप देखील गुगल प्ले स्टोअर वरुन हटवण्यात आले होते.