डॉमिनोज (Photo credit : Firstpost Hindi)

जर का तुम्ही प्रसिद्ध फूड चेन डॉमिनोज (Dominos) मधून अन्नपदार्थ मागवत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. लोकप्रिय पिझ्झा ब्रँड डॉमिनोजचा डेटा पुन्हा एकदा लीक (Data Leak) झाला आहे. सुरक्षा तज्ञाच्या मते, 18 कोटी ऑर्डरचा डेटा डॉर्क वेब उपलब्ध झाला आहे. एप्रिल महिन्यात, हॅकरने सांगितले होते की, त्याने 13TB Dominos डेटाची माहिती मिळवली आहे. आताच्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डरची माहिती आहे, ज्यात वापरकर्त्यांचा फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट तपशील आणि क्रेडिट कार्ड यांच्या माहितीचा समावेश आहे.

सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजरिया यांनी ट्विटरवरुन हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुन्हा एकदा डॉमिनोजचा डेटा लीक झाला आहे. सर्च इंजिनवर 18 कोटी वापरकर्त्यांचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात डॉमिनोजकडून नेहमी खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांच्या डेटाचा समावेश आहे. म्हणजेच जवळजवळ 18 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस, सायबर सुरक्षा कंपनी हडसन रॉकचे सीटीओ Alon Gal यांनी पहिल्यांदा याबाबत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती 10 BTC ना विकली जात आहे.

राजशेखर यांनी आपल्या अजून एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, या कथित उल्लंघनाचा सर्वात वाईट भाग म्हणजे लोक हा डेटा वापरकर्त्यांच्या हेरगिरीसाठी वापरत आहेत. अशाप्रकारे कोणीही कोणाचाही मोबाइल नंबर सहज शोधू शकतो आणि त्या व्यक्तीचे आधीचे लोकेशन अगदी तारीख आणि वेळेसह जाणून घेऊ शकतो. अशाप्रकारे यामुळे लोकांच्या गोपनीयतेस मोठा धोका निर्माण झाला आहे.

(हेही वाचा: मोबाईल फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात? 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन करा अनलॉक)

दुसरीकडे, डॉमिनोज इंडियाने या सर्व गोष्टी नाकारल्या असून म्हटले आहे की, याक्षणी त्यांच्याकडून कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा लीक झाला नाही. दरम्यान, डोमिनोक ज्युबिलंट फूडवर्क्सद्वारे (Jubilant Foodworks) अधिकृत एक प्रसिद्ध खाद्य सेवा कंपनी आहे. डोमिनोजचे 285 शहरांमध्ये आउटलेट्स आहेत. याशिवाय बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथेही त्यांच्या शाखा आहेत.