चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) रेनो 5 5जी सीरीज कधी लॉन्च होणार? याची सर्वांनाच उस्तुकता लागली होती. दरम्यान, एका विबो पोस्टमध्ये या सीरीज लॉन्चिंगची तारिख सांगितली गेली आहे. त्यानुसार, येत्या गुरुवारी (10 डिसेंबर) ओप्पोची 5 जी सीरीज लॉन्च होणार आहे. दरम्यान, ओप्पो रेनो 5 आणि रेनो 5 प्रो 5जी लॉन्च हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित आहेत. या सीरीजमध्ये चमकदार मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे रात्रीच्या अंधारातदेखील हे दोन्ही स्मार्टफोन चमकणार आहेत. सध्या या स्मार्टफोनची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे.
रेनो 5 5जी सीरीजमध्ये पंचहोल डिझाईन सोबत 90एचझेड रिफ्रेश रेटचा ओएलईडी पॅनेल मिळू शकतो. रेनोच्या या सीरीजमध्ये 6.43 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तर रेनो5 प्रो 5G आणि प्रो+ 5G मध्ये कंपनी 6.55 इंचाच डिस्प्ले मिळू शकतो. या सीरीजमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड ColorOS 11 मिळू शकत .प्रोसेसरमध्ये रेनो 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 765 जी, रेनो5 प्रो मध्ये Dimensity 1000+ आणि रेनो5 प्रो+ मध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट मिळू शकते. रेनो 5 5जी मध्ये बॅटरी 4300mAh मिळू शकते. रेनो 5 प्रो मध्ये 4350 एमएएच आणि रेनो5 प्रो+ मध्ये 4500 एमएएच बॅटरी क्षमता मिळण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा- Trojan Horse Virus: चीनी कंपनी Gionee ने 2 कोटी मोबाईलमध्ये व्हायरस सोडून कमावले कोट्यावधी रुपये; कोर्टाने सुनावली शिक्षा
ओप्पो रेनो 5 5जी मध्ये दोन स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12 जीबी 256 जीबी इंटरनल स्टोरेट देण्यात आले आहे. तसेच रेनो 5 प्रो 5 जी मध्येही दोन स्टोरेज पर्याद देण्यात आले आहेत. रेनो 5 5जी स्मार्टफोनची किंमत 37 हजार 366 रुपये तर, रेनो 5 प्रो 5 जीची किंमत 44 हजार 44 रुपये असण्याची शक्यता आहे.