Oppo चा 75 इंचाचा मोठा डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 26 सप्टेंबरला होणार लाँन्च
Oppo TV (PC - Twitter)

टीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या स्मार्टफोन कंपन्यांचा कल वाढताना दिसत आहे. शाओमी नंतर, ओप्पो देखील यामध्ये विस्तार करत आहे. येत्या 26 सप्टेंबर रोजी चीनमध्ये आपला स्मार्ट टीव्ही लाँच करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. कंपनीने शेअर केलेल्या लॉन्च इव्हेंट पोस्टरनुसार, ओप्पो आपला के 9 प्रो स्मार्टफोन ओप्पो स्मार्ट टीव्ही के 9 नावाच्या अन्य प्रोडक्ट्सह लॉन्च करणार आहे. ओप्पोने या वर्षी मार्चमध्ये स्मार्ट टीव्हीची K9 सीरीज लाँन्चकेली होती. जी तीन वेगवेगळ्या डिस्प्ले आकारांसह येते, 43-इंच, 55-इंच तसेच 65-इंच. आता कंपनी 75-इंच चीनमध्ये 26 सप्टेंबरला लॉंन्च करणार आहे. K9 डिस्प्ले मॉडेलसह नवीन स्मार्ट टीव्हीची घोषणा करण्यासाठी सज्ज आहे.

GizmoChina च्या मते, 75-इंच स्मार्ट टीव्ही K9 च्या लॉन्चशी संबंधित कंपनीने शेअर करण्यात आलेल्या पोस्टर मधून कळते की, डिव्हाइस 1.07 अब्ज रंगांना सपोर्ट करणार आहे. सॉफ्टवेअर विभागात, स्मार्ट टीव्ही अँड्रॉइडवर आधारित कलर ओएस टीव्ही 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

OPPO स्मार्ट टीव्ही K9 HDR 10+, 93% DCI-P3 रंग सरगम आणि निळ्या-प्रकाशाच्या सपोर्टसह येऊ शकतो. स्मार्ट टीव्ही मीडियाटेक MT-9652 चिपसेटद्वारे संचलित असेल. जे चार एआरएम कॉर्टेक्स-ए 73 सीपीयू कोर आणि एआरएम माली-जी 52 एमसी 1 जीपीयू-65-इंच मॉडेलसारखेच आहे. के 9 स्मार्ट टीव्ही लाइनअपचे तीन विविध स्क्रीन आकार समान एलईडी-बॅकलिट (डीएलईडी) एलसीडी पॅनेलसह येतात. परंतु विविध स्क्रीन रिजॅाल्यूशन देखील असू मिळू शकतात.

ओप्पो के 9 43-इंच व्हेरिएंटचा डिस्प्ले एफ 1080 x 1920 पिक्सेलच्या एफएचडी+ रिझोल्यूशनला समर्थन देतो, तर 55-इंच आणि 65-इंच मॉडेल 2160 x 3840 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतात. सर्व मॉडेल्समध्ये स्टॅंडर्ड रिफ्रेश दर 60Hz आहे. टीव्हीमध्ये ब्लूटूथ व्हॉइस आणि Xiaobu

AIअसिस्टंट NFC सक्षम रिमोट कंट्रोल आणि ओप्पो स्मार्टफोनमधील कंटेट शेअर करण्याची शक्यता आहे.