
स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात आपल्या एफ सीरिजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो एफ19 Oppo F19 हा स्मार्टफोन आणला आहे. कंपनीने या सीरिजमधील ओप्पो एफ 19 प्रो आणि ओप्पो एफ 19 प्रो + हे दोन स्मार्टफोन यापूर्वीच बाजारात आणले होते. ओप्पो एफ19 ची किंमत 19 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. महत्वाचे म्हणजे, या किंमतीत ग्राहकांना 5 हजार एमएएचची क्षमता असलेली बॅटरी आणि 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह अनेक धमाकेदार फिचर्स मिळणार आहेत. तर, या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
त्याच व्हेरिएंटमध्ये कंपनीने ओप्पो एफ 19 लाँच केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,990 रुपये आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 9 एप्रिल रोजी होणार आहे. फ्लिपकार्ट व कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फोनची प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. हा स्मार्टफोन प्रिझम ब्लॅक आणि मिडनाइट ब्लू अशा दोन रंगांत मिळणार आहे. हे देखील वाचा- Oppo A74 आणि Oppo A74 5G झाले लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून
ओप्पो एफ 19 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा एमओएलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. हा स्मार्टफोन केवळ अर्ध्या तासात 54 टक्के चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे.