Oppo A74 आणि Oppo A74 5G झाले लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून
Oppo A74 & Oppo A74 5G (Photo Credits: Oppo)

ओप्पो (Oppo) कंपनी चाहत्यांसाठी नवनवीन स्फार्टफोन घेत असते. यातच कंपनीने ओप्पो ए74 (Oppo A74) आणि ओप्पो74 5 जी (Oppo A74 5G) हे दोन धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने ओप्पो 74 5 जी स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीचा हा 5 जी स्मार्टफोन थायलंड येथे उपलब्ध करण्यात आला आहे. तर, ओप्पो ए74 हा स्मार्टफोन केवळ फिलीपीन्स आणि कंबोडियात लॉन्च करण्यात आला आहे. ओप्पोचे हे स्मार्टफोन अनेकांना पसंत येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तर, जबरदस्त फिचर्स असलेल्या या दोन्ही स्मार्टफोनची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पंच-होल असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. 4 जी स्मार्टफोनमध्ये 6.43 फुल एचडी प्लस एएमओलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचचा एलसीडी पॅनल असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या 4 जी व्हॅरियंटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे. तर, 5 जी व्हॅरियंटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा- How to Watch IPL 2021 For Free: घरी बसल्या फ्रीमध्ये लुटा आयपीएलची मजा, Jio ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये मोफत मिळते Disney+ Hotstar ची मेंबरशिप

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए74 4जी मध्ये एलइडी फ्लॅशसोबत ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश आहे. 5 जी स्मार्टफोनमध्येही अशीच स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत. परंतु, यात एक 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स एक्स्ट्रा दिया गया है. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो ए 74 4 जी मध्ये स्नॅपड्रॅगन 662 मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 5 जी मध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. परंतु, फोनच्या 4G व्हेरिएंटमध्ये 5 वॅट व्हेरिएंटमध्ये 33 वॅटचे फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. फिलिपिन्समध्ये 4 जी व्हेरिएंटची भारतीय किंमतीनुसार 18 हजार रुपये आहे. तर, 5 जी व्हेरिएंटची किंमत भारतीय किंमतीनुसार 21 हजार इतकी आहे.