चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Oppo ने A सीरिजच्या नव्या हँडसेट Oppo A94 हा UAE मध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी मीडियाटेक Helio P95 प्रोसेसर मिळणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला डिवाइसमध्ये 4310mAh च्या बॅटरीसह 48MP चा कॅमेरा मिळणार आहे. तर स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या फोनमध्ये 6.43 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. तसेच यामध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसर, 8GB Of LPDDR4x रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सुद्धा दिला गेला आहे. जो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे.
कंपनीने Oppo A94 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2MP चा मॅक्रो लेन्स आणि चौथा 2MP चा डेप्थ सेंसर आहे. त्याचसोबत याच्या फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हे डिवाइस टाइम लॅप्स, पोट्रेट मोड आणि नाइट मोडसारख्या कॅमेरा फिचर्सला सपोर्ट करणार आहे.(Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)
ओप्पो ए94 स्मार्टफोनमध्ये 4310mAh ची बॅटरी दिली गेली असून जो 30ऐ VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त 4G VoLTE, वायफाय, ब्लुटूथ 5.1 आणि युएसबी टाइप सीी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ 21,869 रुपये आहे. तर फोन Fluid Black आणि Fantasy Purple कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. परंतु भारतात हा स्मार्टफोन लॉन्च कधी केला जाणार याबद्दल माहिती दिली नाही.