Oppo A74 5G स्मार्टफोन येत्या 13 एप्रिलला होऊ शकतो लॉन्च, रिपोर्ट्समधून खुलासा
Oppo (Photo Credit: Oppo )

टेक कंपनी Oppo ने आपला शानदार स्मार्टफोन Oppo A74 5G लॉन्च करण्यासाठी तयारी केली आहे. ओप्पो कंपनीच्या या स्मार्टफोन संदर्भात समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, तो नुकताच ऑस्ट्रेलियाच्या रिटेलर वेबसाइटवर दिसून आला आहे. तेथे त्याची किंमत, स्पेसिफिकेशन आणि लॉन्चिंगच्या तारखेबद्दल खुलासा करण्यात आला आहे. तर जाणून घ्या ओप्पो कंपनीच्या या स्मार्टफोन बद्दल अधिक. ऑस्ट्रेलियन रिटेलर बेसाइटच्या लिस्टिंगनुसार, ओप्पो ए74 5जी स्मार्टफोन 13 एप्रिलला लॉन्च केला जाणार आहे. फक्त 6GB+126GB स्टोरेज उपलब्ध असणार आहे. याची किंमत AUD 444 (जवळजवळ 24,800 रुपये) असणार आहे. कंपनीकडून ओप्पो ए74 5जी लॉन्चिंग, किंमत आणि फिचर्स संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लिस्टिंगच्या मते, ओप्पो ए74 5जी अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड कलर ओएस 11.1 ऑपरेटिंग सिस्टिम वर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल असणार आहे. त्याचसोबत क्वालकॉमचा Snapdragon 480 प्रोसेसर दिला जाणार आहे. ओप्पो ए74 5जी क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये 48MP छा प्रायमरी सेंसर, 8MP चा दुसरा सेंसर आणि अन्य 2MP चा सेंसर दिला आहे, त्याचसोबत सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.(LG मोबाइल फोन वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! कंपनी स्मार्टफोन व्यवसाय बंद करणार)

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळणार आहे. तर फास्ट चार्जिंग सपोर्ट व्यतिरिक्त डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय,जीपीएस,ब्लूटूथ आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले जाणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ओप्पो ए55 5जी उतरवण्यात आला होता. या फोनची किंमत 1599 चीनी युआन जवळजवळ 18,00 रुपये आहे. ओप्पो ए55 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 वर आधारित ColorOS 11.1 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाच एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 1600X720 पिक्सल आहे. त्याचसोबत यामध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. जो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.