Online Gaming (PC - Wikimedia Commons)

Online Betting Advisory: सरकारने गुरुवारी ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) साठी नवीन नियम (New Rules) जारी केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी नवीन नियमांची घोषणा केली आहे. नवीन गेमिंग नियमांमुळे ऑनलाइन गॅम्बलिंग आणि बेटिंग प्लेटफॉर्मवर कोणत्याही गेम सट्टेबाजांना प्रतिबंध करणं शक्य होणार आहे. तसेच, या नियमांनुसार, सर्व ऑनलाइन गेम स्वयं-नियामक संस्था (SRO) द्वारे निर्धारित केले जातील.

माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, जुगार किंवा सट्टेबाजीचा समावेश असलेले ऑनलाइन गेम नवीन ऑनलाइन गेमिंग नियमांच्या कक्षेत येतील. राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही एका फ्रेमवर्कसह काम करत आहोत. ज्याद्वारे सर्व ऑनलाइन गेमिंगचे नियमन SRO द्वारे केले जाईल. म्हणजेच, गेममध्ये गॅम्बलिंग आहे की नाही हे SRO ठरवेल. ते म्हणाले की अनेक एसआरओ असतील आणि या एसआरओमध्ये उद्योगासह सर्व भागधारकांचा सहभाग असेल. (हेही वाचा - Meta Strike on Bad Content In India: मेटाची भारतात मोठी कारवाई; Facebook आणि Instagram वरून 28 दशलक्ष खराब कंटेंट काढून टाकला)

राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं की, एक स्वयं-नियामक संस्था प्रत्येक गेमचे निरीक्षण आणि न्याय करण्यासाठी काम करेल. अॅपमध्ये बेटिंगचा समावेश आहे की नाही, या आधारे परवानगी निश्चित केली जाईल. सट्टेबाजीचा समावेश असल्यास, SRO त्या ऑनलाइन गेमला परवानगी नाही असे म्हणण्याच्या पर्याय असेल. म्हणजेच अॅपला एसआरओची परवानगी घेणे बंधनकारक असेल.