OnePlus TV U आणि Y सिरीज भारतात लॉन्च, 12,999 रुपयांपासून उपलब्ध; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
OnePlus TV U Series & OnePlus TV Y Series Launched in India (Photo Credits: OnePlus India)

चायनीज टेक ब्रँड वनप्लस (OnePlus) ने गुरुवारी (2 जुलै) बजेट टीव्ही सेगमेंटमध्ये दोन नवे टीव्ही लॉन्च केले आहेत. वनप्लस U सिरीज आणि Y सिरीजच्या टीव्हीची किंमत 12,999 पासून सुरु होत आहे. वनप्लस टीव्हीच्या U सिरीजमध्ये 55 इंचाचा 4K UHD डिस्प्ले दिला असून याची किंमत 49,999 इतकी आहे. वनप्लस Y सिरीजमध्ये 32 इंच आणि 43 इंचाचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले असून त्यांची किंमत अनुक्रमे 12,999 रुपये आणि 22,999 रुपये इतकी आहे.

वनप्लस टीव्हीच्या Y सिरीच्या 32 इंच टीव्ही हा 5 जुलै पासून Amazon.in वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. वनप्लस कंपनीने असे सांगितले की, Y सिरीजच्या 43 इंच व्हेरिएंट आणि U सिरीजचा 55 इंचाचा वेरिएंट लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. या टीव्ही मध्ये मल्टिपल स्मार्ट फिचर्स असून एकाच वेळी 5 वेगवेगळ्या डिव्हाईसेसना कन्टेक्ट होऊ शकतो.

वनप्लस इंडियाचे व्हाईस प्रेसिडन्ट नवनीत नाकरा (Navnit Nakra) यांनी IANS ला दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन फिचर्स, वनप्लसचे अप्रतिम डिझाईन आणि वनप्लस कनेक्टचं युनिक फिचर यामुळे हा टीव्ही इतरांपेक्षा वेगळा आहे. या टीव्हीजमध्ये अनेक इनोव्हेटीव्ही फिचर्स अॅड केल्यामुळे तुम्ही ब्लुटुथ आणि वायफायचा उपयोग करुन एका वेळेला पाच वेगवेगळ्या डिव्हाईसेसना कनेक्ट करु शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे वनप्लस स्मार्टफोन असेल तर त्याचा तुम्ही रिमोट म्हणूनही वापर करु शकता.

OnePlus India Tweet:

युजर्संना सिनेमॅटीक अनुभव देण्यासाठी 30 व्हॅटचे 4 स्पिकर्स टीव्हीमध्ये दिले असून त्याला Dolby Atmos चा सपोर्ट आहे. तसंच या टीव्हीमध्ये अॅनरॉईड 9.0 व्हर्जन आहे. वनप्लस Y सिरीजमधील 43 इंच आणि 32 इंच व्हेरिएंटमध्ये 90% स्क्रिन टू बॉडी रेश्यो दिला असून bezel-less डिझाईन देण्यात आली आहे.

OnePlus TV U Series & OnePlus TV Y Series (Photo Credits: IANS)

Oxygen Play मुळे या टीव्हीद्वारे तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपभोग सहजरित्या घेऊ शकता. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ सारख्या ऑनलाईन स्ट्रिम करणाऱ्या प्लॅटफॉर्मचा आनंदही लुटू शकता, असे नाकरा यांनी सांगितले आहे.