OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 22 जुलै रोजी होणार लॉन्च; काय असेल किंमत आणि फिचर्स? जाणून घ्या
OnePlus Nord 2 5G (Photo Credits: OnePlus India)

वनप्लस नॉर्ड 2 5 जी (OnePlus Nord 2 5G) स्मार्टफोनची लॉन्च तारीख अखेर जाहीर झाली आहे. चायनीज फोन ब्रँडचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 22 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. याची घोषणा वनप्लसच्या ऑफिशियल ट्विटर हँटलवरुन करण्यात आली आहे. तसंच स्मार्टफोनच्या फिचर्स, किंमत विषयीही काही उलघडा करण्यात आला आहे. लॉन्चनंतर इतर वनप्लस डिव्हाईसेस प्रमाणे हा स्मार्टफोनही ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. (OnePlus Nord CE 5G आणि OnePlus TV U1S भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत)

वनप्लसचा हा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. 32MP चा पंच होल सेल्फी शूटरही देण्यात आला आहे. तसंच 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आला आहे.

OnePlus Nord 2 (Photo Credits: 91 Mobiles)

OnePlus Nord 2 5G (Photo Credits: Amazon India)

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्डमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी सेन्सर 50MP चा असून 8MP ची अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स, 2MP च्या स्नॅपर सह देण्यात आली आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा फोन अॅनरॉईड 11 आधारीतOxygenOS 11 वर काम करतो. OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 24,999 रुपयांना उपलब्ध होईल. असा अंदाज बांधला जात आहे.