OnePlus 9, OnePlus 9R Smartphones To Go on Sale Tomorrow (File Photo)

सध्या चर्चेत असलेले स्मार्टफोन्स वनप्लस 9 (OnePlus 9) आणि वनप्लस 9 आर (OnePlus 9R) यांचा सेल आजपासून सुरु होत आहे. अॅमेझॉन डॉट.इन (Amazon.in)  वर दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरु होणार आहे. या सोबतच रेड केबल क्लब मेंबर्स (Red Cable Club Members) कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा फोन विकत घेऊ शकतात. कॅमेरा आणि प्रोसेसर वगळला असता हे दोन्ही फोन्सचे फिचर्स साधारण सारखेच आहेत.

वनप्लस 9 चा 8 जीबी+128 जीबी वेरिएंट 49,999 रुपयांना तर 12 जीबी वेरिएंट 54,999 रुपयांना मिळेल. वनप्लस 9आर चा 8 जीबी वेरिएंट 39,999 रुपयांना आणि 12 जीबी वेरिएंट 43,999 रुपयांना मिळेल. वनप्लस 9 च्या लॉन्च ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयचा पर्याय निवडल्यास तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. अमेरिकन एक्स्प्रेस कार्ड वापरल्यास 10 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. यासोबतच एसबीआय क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय चा पर्याय देखील उपलब्ध आहे.

OnePlus India Tweet:

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.55  इंचाचा फ्लुईड डिस्प्ले दिला असून 120 हर्ट्स सोबत 2400x1080 पिक्सलचा स्क्रिन रिजोल्यूशन देण्यात आला आहे. वनप्लस9 आर मध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॅम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह देण्यात आला आहे. वनप्लस 9 मध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह देण्यात आला आहे.

वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला असून 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेन्स देण्यात आला आहे. वनप्लस 9 आर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप असून 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड एंगल लेन्स, 2 मेगापिक्लसचा मोनोक्रोम आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रोलेन्स देण्यात आला आहे. या दोन्ही मोबाईल्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला असून 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.