OnePlus 8 & OnePlus 8 Pro Second India Sale: आज दुपारी 12 पासून Amazon.in आणि OnePlus.in वर सेलला सुरुवात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
OnePlus 8 Series India Sale (Photo Credits: OnePlus India)

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro 5G या स्मार्टफोनचा आज दुसरा सेल आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया (Amazon.in) आणि OnePlus.in वर हा सेल सुरु होणार आहे. या सेल अंतर्गत वनप्लस 8 सिरीजमदील दोन्ही स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सूट मिळेल. रिलायन्स जिओचे 6 हजार रुपयांचे बेनिफिट्स मिळतील. त्याचबरोबर प्री बुकींग केलेल्यांना 1 हजार रुपयांचा अॅमेझॉन पे कॅशबॅक मिळेल.

OnePlus 8 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+Super AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. OnePlus 8 Pro 5G मध्ये 6.78 इंचाचा OHD+ super AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. OnePlus 8 मध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप असून 48MP चा प्रायमरी कॅमेरा सोनी IMX586 सेन्सरसह देण्यात आला आहे. 16MP चा अल्ट्रा व्हाईड एँगल लेन्स आणि 2MP मॉक्रो लेन्स कॅमेरा आहे. OnePlus 8 Pro मध्ये रिअर कॅमेरा मॉड्युल असून 48MP चा कॅमेरा सोनी IMX689 सेंसरसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 48MP चा अल्ट्रावाईड एँगल लेन्स, 8MPची टेलिफोटो लेन्स आणि 5MP ची कलर फिल्टर लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी दोन्ही मोबाईलमध्ये 16MP चा कॅमेरा सोनी IMX471 सेन्सरसह देण्यात आला आहे.

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर, अॅनरॉईड 10 आणि OxygenOS देण्यात आली आहे. OnePlus 8 मध्ये 4,300mAh ची बॅटरी असून 3oT फास्ट चार्गिंग सपोर्ट सिस्टम देण्यात आली आहे. तर OnePlus 8 Pro मध्ये 4,510mAh ची बॅटरी 3oT फास्ट चार्गिंग सपोर्ट सिस्टमसह देण्यात आली आहे. OnePlus 8 मध्ये 6GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे. तर 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. वनप्लस 8 प्रो मध्ये 8GB रॅम + 128GB मेमरी असलेल्या व्हेरिएंटची किंमत 54,999 असून 12GB रॅम +256GB मेमरी असलेल्या व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.