OnePlus 10 Pro in India: अखेर प्रतीक्षा संपली; भारतामध्ये 31 मार्चला लॉन्च होणार वन प्लस 10 प्रो, जाणून घ्या फीचर्स आणि काय असू शकते किंमत
OnePlus 10 Pro (Photo Credits: OnePlus)

अखेर प्रतीक्षा संपली आहे. OnePlus 10 Pro भारतात 31 मार्च रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने आज घोषणा केली की, हा स्मार्टफोन एका मोठ्या लॉन्च इव्हेंटमध्ये सादर केला जाईल. या व्यतिरिक्त, यावेळी OnePlus Buds Pro True वायरलेस इयरबड्स देखील नवीन रेडियंट सिल्व्हर कलरवेमध्ये लॉन्च केले जातील. कंपनी त्याच दिवशी OnePlus Bullets Wireless Z2 वायरलेस इयरफोन्स भारतात लॉन्च करेल. OnePlus 10 Pro चा लॉन्च इव्हेंट भारतात 31 मार्च संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तुम्ही OnePlus 10 Pro लाँच पेज आणि OnePlus YouTube चॅनलवर हा सोहळा पाहू शकता.

OnePlus 10 Pro ला स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेटसह 12GB LPDDR5 रॅम मिळणार आहे. हे आउट ऑफ द बॉक्स ColorOS 12.1 वर आधारित Android 12 वर चालेल. स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाच्या QHD+ डिस्प्लेसह येतो. OnePlus 10 Pro ला 80W फास्ट चार्जरसह 5000mAh बॅटरी मिळाली आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असेल. फ्रंटला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. भारतामध्ये व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट कलर व्हेरियंट सादर केले जाण्याची आधीच पुष्टी झाली आहे. OnePlus 10 Pro भारतात Amazon द्वारे लॉन्च होऊ शकतो. (हेही वाचा: Flipkart ची धमाकेदार ऑफर! 16 हजार किमतीचा Realme स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करता येणार; जाणून घ्या काय आहे Deal)

चीनमध्ये OnePlus 10 Pro ची किंमत CNY 4,699 (अंदाजे रु 54,500) आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. भारतात त्याची किंमत काय असेल हे 31 मार्चलाच कळेल. मात्र भारतामध्ये बेस व्हेरियंटची किंमत साधारण 55 हजार असून शकते अशी शक्यता आहे. आता हे पाहणे मनोरंजक असेल की कंपनी चीनमध्ये लॉन्च केलेला OnePlus 10 Pro हाच फोन भारतात आणते की, तो काही बदलांसह लॉन्च केला जाईल.