Flipkart ची धमाकेदार ऑफर! 16 हजार किमतीचा Realme स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करता येणार; जाणून घ्या काय आहे Deal
Realme 9i (PC- @gizmochina/twitter)

Flipkart Realme Super 9 Days Sale: सध्या शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर Realme Super 9 Days Sale सुरू आहे. हा सेल 21 मार्च ते 31 मार्च पर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, Realme स्मार्टफोन्सवर खूप मोठी सूट आहे. या सेलमध्ये तुम्हाला Realme 9i खूप स्वस्तात खरेदी करता येईल. तुम्ही 15,999 रुपयांचा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Flipkart Realme Super 9 Days Sale -

Realme 9i च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्च किंमत 15,999 रुपये आहे, परंतु हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर आहे. ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होईल. (हेही वाचा - Instagram ला टक्कर देण्यासाठी आले नवीन Rossgram अॅप; 'या' देशात होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर)

Flipkart Realme Super 9 Days Sale: Realme 9i एक्सचेंज ऑफर

Realme 9i वर Rs 12,450 ची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अदलाबदल केलात तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. परंतु तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच 12,450 रुपये सूट मिळेल. असं असल्यास तुम्हाला हा फोन 549 रुपयांना खरेदी करता येईल.

Flipkart Realme Super 9 Days Sale: Realme 9i बँक ऑफर

जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा नसेल आणि तुम्ही इतर ऑफर शोधत असाल, तर तुम्ही Realme 9i खरेदी करण्यासाठी HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 11,999 रुपये असेल.