SaaS (सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस) प्लॅटफॉर्म ओमुनी टाळेबंदी (Omuni ) धोरण अंमलात आणत आहे. ज्याचा फटका 35% कर्मचाऱ्यांना बसणार आहे. म्हणजेच शिप्रॉकेटच्या मालकीच्या या कंपनीने 60 ते 70 करमचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, कंपनीतून अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य स्टाफलाही कंपनीच्या या धोरणाचा फटका बसणार आहे. Inc42 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, नोकरीतील कपातीमुळे तंत्रज्ञान, उत्पादन, विक्री आणि talent acquisition आदी विभागांतील कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. टाळेबंदीमुळे ज्या कर्मचाऱ्यांपुढे बेकारीचे संकट तर जे कंपनीत मागे आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण, असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळू शकते.
मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बेंगळुरूस्थित कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक मुकुल बाफना आणि सीटीओ सुमीत चंधोक यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही व्यवस्थापन संघातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे टाळेबंदी एकाच वेळी इतके जबाबदार लोक बाहेर पडल्याने अनेकांनी कंपनीच्या भवितव्यावरच टांगतील तलवार असल्याचे म्हटले आहे.
कंपनी व्यवस्थापनाने मात्र म्हटले आहे की, शिप्रॉकेटमध्ये, आम्ही एक पूर्ण-स्टॅक ई-कॉमर्स सक्षम प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. त्यामुळे भागीदारी, विलीनीकरण आणि अधिग्रहणांद्वारे आमच्या व्यापार्यांसाठी खूप मोठा व्यवसायिक प्रभाव निर्माण करण्यासाठी नेहमीच संधी शोधत आहोत. त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले आहेत.