ऑडिओ रिंगटोनचा जमाना गेला, आता फोनमध्ये ठेवा Video Ringtone; पहा कसे
Video Ringtones App (Photo credit : youtube)

Video Ringtone : आतापर्यंत तुम्ही तुमच्या फोनमध्ये विविध प्रकारची गाणी, संगीत, चित्रविचित्र आवाज रिंगटोन म्हणून ठेवले असतील. लोकांच्या हटके रिंगटोनचे कौतुकही केले असेल किंवा त्रासही झाला असेल. मात्र टेक विश्वात एक नवीन चमत्कार घडत आहे. आता चक्क एखादा व्हिडिओ तुम्ही तुमची रिंगटोन म्हणून ठेऊ शकणार आहात. एका अमेरिकन कंपनीने ‘Vyng’ नावाचे एक अॅप बाजारात आणले आहे. या अॅपमार्फत तुम्ही तुमची रिंगटोन म्हणून एखादा व्हिडीओ वापरू शकणार आहात. सध्या हे अॅप गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

या अॅपमध्ये संगीताचे विविध पर्याय देण्यात आले आहे. भारतीय युजर्सना डोळ्यासमोर ठेऊन, अगदी बॉलीवूडच्या गाण्यांपासून ते भक्तीसंगीतापर्यंत अनेक गाणी व्हिडिओ रिंगटोनसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये एक खास फीचर समाविष्ट केले गेले आहे, याद्वारे तुम्ही एखादा व्हिडिओ स्वतः या अॅपमध्ये अपलोड करून तो तुमची रिंगटोन म्हणून ठेऊ शकता. (हेही वाचा : आता नेटवर्क नसतानाही कॉल करणे होणार शक्य)

सध्यातरी या अॅपचा वापर फक्त अँड्रॉइड मोबाइलचे वापरकर्तेच करू शकणार आहेत. आयफोनच्या ग्राहकांना ही सुविधा अद्याप देण्यात आलेली नाही. 2017 मध्ये हे अॅप बाजारात आले. सध्या हे अॅप 150 पेक्षा जास्त देशात वापरले जात असून, 2 बिलीयन लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. तर मग वाट कसली पाहताय? तुम्हीही ठेवा एखादा व्हिडिओ तुमची रिंगटोन म्हणून.