Gmail New Feature: जी-मेल वर येणारा कंटेन्ट कळत नाही? आता प्रश्न मिटला, गुगलने जारी केलं नवीन फीचर्स
gmail Wikimedia Commons

Gmail New Feature: जी-मेल (Gmail) मध्ये आता नवीन फीचर्स आलं आहे. नुकतंच लॉन्च झालेलं हे फीचर्स   लोकांच्या पंसती पडलं आहे. जी -मेलवर येणाऱ्या मेसेजचं भाषांतर होणार आहे. नवीन फीटर्समध्ये आपला कोणताही मेसेज कोणत्याही भाषेमध्ये भाषांतर करु शकेल. या भन्नाट फीचर्समुळे लोकांच्या भाषेसंबंधी प्रश्न सुटणार आहे. हे फिचर्स आधी फक्त वेबवर उपलब्ध होते. आता  Android आणि iOS डिव्हाईससाठी उपलब्ध झालं आहे.मोबाईल वर हे फीचर्स उपलब्ध झाल्याने याला अनेक युजर्सकडून पसंती पडली आहे.

वेबवर उपलब्ध असताना देखील १०० हून अधिक भाषांमध्ये भाषांतर करता येत होते. आजपासून हे फीचर्स मोबाईल मध्ये उपलब्ध होणार आहे. हे फिचर ईमेल कंटेटची भाषा डिक्टेक्ट करते आणि त्याला टॉप बॅनरवर डिस्प्ले करते. त्यानंतर यूजर्स आपल्या आवडीच्या भाषेत सिंगल टॅपमध्ये भाषांतर करू शकतात. उदाहरणार्थ, ईमेल इंग्रजीत असल्यास आणि यूजर्सची भाषा हिंदी असल्यास, ट्रान्सलेटेड मजकूर पाहण्यासाठी तुम्ही "हिंदीमध्ये भाषांतर करा" वर टॅप करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला ईमेलचे हिंदीमध्ये भाषांतर झालेले दिसेल.

असा पध्दतीने वापरा नवीन फीचर्स

  • मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर "अनुवाद करा" पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला मूळ भाषेत ईमेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता.
  • जेव्हा Gmail ला निर्दिष्ट केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ईमेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल.
  • एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला "पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका" वर टॅप करणे आवश्यक आहे.
  • सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता.