WhatsApp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर ग्रूपमध्ये एकाचवेळी 512 सदस्यांना करता येणार अॅड; 'या' स्टेप्स फॉलो करून घ्या नव्या फिचरचा फायदा
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

WhatsApp New Feature: गेल्या महिन्यात, WhatsApp ने 2GB पर्यंत फाइल शेअरिंग आणि इमोजी प्रतिक्रियांसह मोठ्या ग्रूप क्षमतेसह अनेक नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली होती. कंपनीने अलीकडेच मोठ्या साइजच्या फाइल आणि इमोजी प्रतिक्रिया आणल्या आहेत. आता, मेटा-मालकीची कंपनी तुम्हाला एका ग्रूपमध्ये 512 सदस्य जोडण्याची परवानगी देत आहे. पूर्वी ही मर्यादा 256 होती. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे आता तुम्ही एकाचवेळी व्हॉट्सअॅप ग्रूपवर 512 जणांना अॅड करू शकता.

हे नवीन फिचर iOS आणि Android प्लॅटफॉर्मसाठी नवीनतम WhatsApp आवृत्ती 2.22.11.75 वर उपलब्ध आहे. 512 सदस्य ग्रूप फिचर प्राप्त करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp अपडेट असणे आवश्यक आहे. हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे की, नाही हे तपासण्यासाठी तुम्ही एक ग्रूप तयार करू शकता. या फिचरद्वारे तुम्ही एका ग्रूपमध्ये 512 सदस्यांना जोडू शकता. (हेही वाचा - WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपने आणणार नवीन फीचर; आता यूजर्स PC, Laptop आणि Phone वर डाउनलोड करु शकणार चॅट बॅकअप)

या व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपने एका नवीन एडिट मेसेज फीचरवर काम करत असल्याचंही म्हटलं आहे. या फिचरद्वारे तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता. याशिवाय, हटवलेल्या चॅट्ससाठी चॅट बॅकअपचा पर्याय आणि नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्यासाठी डबल ओटीपी, आदी फिचरवर कंपनी काम करत आहे.

व्हॉट्सअॅपचे हे अपडेट प्रत्येक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यांना त्यांच्या अॅपवर हे नवीन ग्रूप फिचर मिळण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. ग्रुपमध्ये 512 सदस्य जोडण्याची प्रक्रिया पूर्वीसारखीच असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 सदस्य कसे जोडावेत -

  • whatsapp उघडा.
  • स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्च आइकॉनवर थ्री-डॉट मेनूवर क्लिक करा.
  • New Group Option वर क्लिक करा.
  • नवीन ग्रूप तयार करण्यासाठी तुमच्या फोन संपर्क सूचीमधून 512 पर्यंत सदस्य जोडा.
  • 512 सदस्य जोडल्यानंतर तुमचा एक नवीन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार होईल.

दरम्यान, व्हॉट्सअॅप त्याच्या काही वैशिष्ट्यांसह इतर अॅप्सच्या मागे आहे. टेलिग्राम तुम्हाला ग्रुपमध्ये सुमारे 2 लाख सदस्य जोडण्याचा पर्याय आधीच देत आहे. येथे तुम्ही मोठ्या फाईल हस्तांतरित करू देतो. तर व्हॉट्सअॅपवर यूजर्संना 2GB फाइल ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. मात्र, व्हॉट्सअॅप आता आपल्या वापरकर्त्यांसाठी नव-नवीन फिचर्स आणत आहे.