WhatsApp New Feature Update: व्हॉट्सअ‍ॅपचं बहुप्रतिक्षित 'One WhatsApp Multiple Phones' फीचर लॉन्च; आता 4 डिव्हाईस मध्ये वापरा अ‍ॅप
WhatsApp Pixabay

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. नव्या अपडेट नुसार युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप एकापेक्षा अधिक फोन मध्ये वापरू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप कडून या नव्या फीचरची माहिती एका ब्लॉग पोस्ट द्वारा दिली आहे. "गेल्या वर्षी, आम्ही जागतिक स्तरावर युजर्ससाठी त्यांच्या सर्व डिव्हाइसेसवर संदेश पाठवण्याची क्षमता आणली होती. यामध्ये सर्व पातळीवर सारखीच गोपनीयता आणि सुरक्षितता राखली जाणार" असं पोस्टमध्ये सांगितलं आहे.

आज, आम्ही एकापेक्षा अधिक फोनवर तेच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरण्याची क्षमता सादर करून आमच्या मल्टी-डिव्हाइस ऑफरमध्ये आणखी सुधारणा करत आहोत,”विशेष म्हणजे, या वैशिष्ट्याची युजर्सकडून खूप विनंती करण्यात आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

युजर्स आता त्यांचा फोन चार अतिरिक्त डिव्हाईस पैकी एक म्हणून लिंक करू शकतात, जसे ते वेब ब्राउझर, टॅबलेट आणि डेस्कटॉपवर WhatsApp शी लिंक करतात. यामध्ये वैयक्तिक संदेश, मीडिया आणि कॉल्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत. तसेच, जर प्रायमरी डिव्हाईस दीर्घ कालावधीसाठी अ‍ॅक्टिव्ह नसेल, तर ते सर्व इतर उपकरणांमधून आपोआप लॉग आउट होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. नक्की वाचा: WhatsApp's New Feature: नवीन कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह न करता वापरकर्त्याला कळणार समोरच्या व्यक्तीचे नाव .

नव्या फीचरच्या  रोलआउट मुळे, युजर्स साइन आउट न करता फोन दरम्यान स्विच करू शकतात आणि त्यांनी जिथे सोडले होते तेथून त्यांचे चॅट्स पुन्हा सुरू होऊ शकतात.