नव्या वर्षात व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यासाठी एक भन्नाट फिचर घेवून आला आहे. २०२२ मध्येही व्हॉट्सअप नवनवे अपडेट्स घेवून येताना दिसला. पण यावेळी व्हॉट्सअप घेवून आलेला फिचर हा अगदीचं अपेक्षेबाहेर आहे. २००९ मध्ये व्हॉट्सअप लॉंच झाल पण त्यानंतर व्हॉट्सअमध्ये अनेक वेगवेगळे बदल करण्यात आले. नवनवीन अपडेटस आलेत फिचर लॉंच केल्या गेले. पण एक गोष्ट मात्र कायम सारखी राहिली ती म्हणजे व्हॉट्सअपचा वापर. प्रत्येक जण आपल्याला हवा तसा, हवा तेव्हा व्हॉट्स अपचा वापर करु शकतो पण विना इंटरनेट व्हॉट्सअप अशक्य. गेल्या १४ वर्षापासून व्हॉट्सअप वापरायला सुरुवात झाली पण व्हॉट्सअप वापरण्यास इंटरनेट असणं अनिवार्य आहे. पण आता जे नव फिचर व्हॉट्सअप कडून लॉंच करण्यात आलं आहे त्यानुसार आता तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप विना इंटरनेट वापरता येणार आहे.
हो, आता विना इंटरनेट तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस पाठवणं शक्य होणार आहे. एवढचं नाही तर विना इंटरनेट तुम्हाला मेसेज रिसीव्ह देखील होतील. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आता विना इंटरनेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅट करता येणार आहे. तर व्हॉट्सअप नव्याने लॉंच करत असलेल्या या नव्या फिचरचं नाव आहे प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअप. तरी या फिचरनुसार केवळ चॅट करता येणार आहे. पण व्हॉट्स अपद्वारे व्हिडीओ कॉल किंवा ऑडिओ कॉल करायचा इंटरनेट अनिवार्य असणार आहे. तरी कालपासून म्हणजेचं ५ जानेवारी पासून व्हॉट्सअने हे नवं फिचर लॉंच केलं आहे. (हे ही वाचा:-WhatsApp Update: 2023 या नव्या वर्षात व्हॅट्सअॅपचे येणार ‘हे’ नवे अपडेट्स, जाणून नव्या फिचर्स बद्दल सविस्तर माहिती)
कसं वापराल व्हॉट्सअपचं नवं फिचर प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअप
- तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअप उघडा.
- त्यानंतर व्हॉट्सअप सेटींग्सवर क्लीक करा.
- आता तुम्हाला तिकडे स्टोरेज अन्ड डेटा ऑप्शन दिसेल, ते निवडा.
- त्यानंतर प्रॉक्सी पर्याय दिसेल, त्यात युज प्रॉक्सी हा पर्याय निवडा.
- यात तुम्हाला तुम्हाला तुमचा प्रॉक्सी सेट करावा लागेल म्हणजेचं प्रॉक्सी अडरेस टाकून तो सेव्ह करावा लागेल.
- या संपूर्ण कृती नंतर तुम्ही तुमच्या फोनवर सहज विना इंटरनेट चॅट करु शकाल.