स्मार्टफोन बाजारात नावाजलेली कंपनी (Nokia) नोकियाने नुकतीच देशात 43, 55, 65 इंच स्मार्ट टीव्ही (Smart TV) लॉन्च केली होती. यातच नोकिया कंपनीने 32 इंच 32TAHDN आणि 50 इंच 50TAUHDN या दोन्ही स्मार्ट टीव्हीला बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. नोकियाचा 30 इंच स्मार्ट टीव्हीमध्ये फूल एचडी डिस्प्ले तर, 50 इंचचा स्मार्ट टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी रेजॉलूशन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन्ही टीव्हीच्या किंमतीबाबत नोकिया कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, 32 इंचाच्या स्मार्ट टीव्ही नोकिया कंपनीचा सर्वात स्वस्त टीव्ही ठरू शकतो.
माहितीनुसार, 43 इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्हीची किंमत 31 हजार 999 रुपये आहे. या हिशोबाप्रमाणे 32 इंच टीव्हीची किंमत 21 हजार ९९९ रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. तर, 50 इंचाच्या टीव्हीची किंमत 36 हजार 99 रुपये असू शकते. नोकिया कंपनीच्या या टीव्हीत जेबीएल स्पीकर्स, इंटेलिजेंट डिमिंग, डीटीएस ट्रसराउंड आणि डॉल्बी ऑडियो यासारखे फीचर्स दिले जावू शकतात. हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमसोबत येईल. यात गुगल असिस्टेंट व्हाईस कमांड इंटरफेस मिळणार आहे. यामुळे हे स्मार्ट टीव्ही बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवले आहेत, अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. हे देखीला वाचा- Poco M2 Pro स्मार्टफोनचा आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार फ्लॅशसेल; जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत
याशिवाय, नोकिया कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन नोकिया 5.3 ऑगस्ट महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम/ 64 स्टोरेज आणि 6 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज या 2 वेरियंट उपलब्ध होणार आहे. नोकिया कंपनीने याच वर्षी नोकिया 8.2 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता.