Nokia कडून Oppo च्या विरोधात खटला दाखल, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

फिनलॅंन्ड बेस्ड स्मार्टफोन ब्रँन्ड Nokia कडून चीनी कंपनी Oppo च्या विरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला पेटेंटच्या उल्लंघनासंबंधित आहे. खरंतर नोकियाजवळ काही पेटेंट आहे. या पेटेंटचा वापर करण्यासाठी नोकिया कंपनी अन्य कंपन्यांना एक परवाना देते. याच प्रकारच्या पेटेंट संदर्भात नोकियाने ओप्पोला 2018 मध्ये एक परवाना दिला होता. या परवानाअंतर्गत ओप्पो कंपनी नोकियाचा पेटेंट वापरु शकत होती. मात्र यासाठी एक मर्यादित कालावधी सुद्धा दिला होता.

Gizmochina च्या रिपोर्ट्सनुसार, ओप्पो कंपनीने लायसन्स रिन्यू केले नाही. तरीही नोकियाचे पेटेंट ओप्पो कडून वापरले जात होते. याच संदर्भात नोकियाकडून आता ओप्पो कंपनीच्या विरोधात चार देश म्हणजे भारत, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, ओप्पो कंपनीकडून सातत्याने मनमानी केली जात होती. नोकियाकडून परवाना नवे नियम आणि अटींसह ओप्पोला रिन्यू करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी तसे न करता नोकियाकडील पेटेंटचा वापर सुरु ठेवला होता. त्यामुळे पेटेंटचे उल्लंघन केल्यामुळे नोकियाने ओप्पोच्या विरोधात खटला दाखल केला आहे.(Mobile Launch : नव्या फिचर्ससह 'या' कंपन्यांचे मोबाईल भारतीय बाजारात येण्यास सज्ज, जाणून घ्या कधी होणार लॉंच)

या प्रकरणी नोकियाने असे म्हटले की, त्यांच्याकडून ओप्पोला पेटेंट रिन्यू करण्यासंदर्भात बातचीत केली होती आणि एक शानदार डिल सुद्धा दिली होती. मात्र ओप्पो कडून सर्व प्रकारचे ऑफरसाठी दुर्लक्ष करण्यात आले. तर ओप्पोने संपूर्ण घटना धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. ओप्पोने वादाला अपमानकारक असल्याचे ही म्हटले आहे.