Layoffs (PC - Pixabay)

मोबाईल फोन कंपनी नोकियामध्ये (Nokia) मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी होणार आहे. खर्चात कपातीचे कारण देत कंपनीने 14 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 16% आहे.  ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कंपनीच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. नोकियाने गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, कर्मचाऱ्यांवरील खर्चात कपात करून 2024 मध्ये किमान 400 दशलक्ष युरो (3507 कोटी) आणि 2025 मध्ये 300 दशलक्ष युरो (2630 कोटी) वाचवण्याची त्यांची योजना आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या सध्याच्या 86 हजारांवरून 72-77 हजारांवर आणावी लागेल.

उत्तर अमेरिकन बाजारात 5G उपकरणांच्या कमकुवत विक्रीमुळे, सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या विक्रीत सुमारे 20% घट झाली. सप्टेंबर तिमाहीत, कंपनीची निव्वळ विक्री 624 कोटी युरो (54.7 हजार कोटी) वरून 498 कोटी युरो (43.7 हजार कोटी) वर घसरली. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) मधील नेटवर्क ऑपरेटर त्यांच्या भांडवली खर्चात कपात करत आहेत, ज्यामुळे 5G उपकरणे उत्पादक कंपन्या संघर्ष करत आहेत.

नोकियाच्या स्वीडिश प्रतिस्पर्धी कंपनी एरिक्सनचा या आठवड्याचा दृष्टीकोनही निराशाजनक आहे. नोकियाचे अध्यक्ष आणि सीईओ पेक्का लुंडमार्क म्हणतात की कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय हा सर्वात कठीण आहे. कंपनीतील प्रत्येक कर्मचारी प्रतिभावान आहे आणि छाटणीनंतर त्यांना सर्व प्रकारे पाठिंबा दिला जाईल. कंपनीचा ऑपरेटिंग खर्च कमी करण्यासाठी छाटणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Lay Off: गुगल समर्थित Adda247 ने कोणतीही पूर्वसूचना न देता 300 लोकांना कामावरून काढले- Reports)

लुंडमार्क असेही म्हणतात की, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एआयच्या युगात गुंतवणुकीशिवाय यश प्राप्त होणार नाही. मात्र सध्या तरी बाजारातील रिकव्हरीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही, परंतु कंपनी 'स्ट्रॅटेजिक, ऑपरेशन आणि कॉस्ट' या तीन पातळ्यांवर निर्णायकपणे काम करत आहे. नोकियाची टाळेबंदीची घोषणा त्याच दिवशी आली ज्या दिवशी कंपनीने अपेक्षेपेक्षा वाईट परिणाम नोंदवले. एका वर्षाच्या आधीच्या याच कालावधीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत विक्री 15% कमी झाली आहे,