Nokia 2.4 स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, Xiaomi, Redmi ला टक्कर देणा-या या फोनची 'ही' असू शकतात खास वैशिष्ट्ये
Nokia 2.4 (Photo Credits: Twitter)

आपल्या जबरदस्त बेसिक फोन्सनी मोबाईलचा दर्जा उंचावणा-या नोकिया (Nokia) कंपनी पुन्हा एकदा स्मार्टफोन्स जगतातही तितक्याच ताकदीने भारतीय बाजारात दमदार फोन्स आणत आहे. आतापर्यंत नोकियाने आपले एकाहून एक सरस स्मार्टफोन्स आणले आहेत. त्यात आता लवकरच नोकियाचा नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात लाँच होण्याच्या तयारीत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा स्मार्टफोन भारतात लाँच होईल. हा स्मार्टफोन Nokia 2.3 चा अपडेटेट व्हर्जन असेल. जबरदस्त बॅटरी आणि कॅमे-यासह बरेच फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची HD LCD डिस्प्ले असू शकते. यात 2GB+32GB RAM णि 3GB 64GB इंटरनल स्टोरेज असू शकते. याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तर 2MP चा सेकेंडरी कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर याच्या मागील बाजूस LED फ्लॅश आणि फिंगरप्रिंट सेंसरचे फिचर्स असू शकतात. यातील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.हेदेखील वाचा- Realme 6 Pro ला मिळाले नवे अपडेट, सुपर पॉवर सेविंग मोडसह मिळणार 'हे' खास फिचर्स

याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात 3.5mm हेडफोन जॅक, सिंगल बँड वायफाय, ब्लुटूथ 5.0, डेडिकेटेड गुगल असिस्टंट आणि 4500mAh ची बॅटरी आणि मायक्रो युएसबी पोर्ट फिचर दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek helio P22 चिपसेट दिला गेला आहे असे सांगण्यात येत आहे.

Nokia 2.4 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 12 चे अपडेट व्हर्जन मिळेल.

दरम्यान नोकिया स्मार्टफोन मेकर कंपनी HMD Global यांनी Nokia 2 V Tella अमेरिकेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षात लॉन्च करण्यात आलेल्या Nokia 2V चा सक्सेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह मोठ्या आकाराचे बेजल दिले गेले आहेत. तसेच फोनध्ये गुगल असिस्टंट बटन दिले आहे. फोनला एकूण तीन कॅमेरे दिले आहेत