प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिअलमी (Realme) कंपनीने युजर्सला दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देत Realme 6 Pro साठी नोव्हेंबर सॉफ्टवेअर अपडेट रोलआउट केले आहे. या अपडेट मध्ये युजर्सला सुपर पॉवर सेविंग मोड आणि मल्टी युजरस फेस सारखे अन्य काही फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. ऐवढेच नाही तर या सॉफ्टवेअरसोबत ऑक्टोंबर 2020 सिक्युरिटी पेल सुद्धा जाहीर केले आहे. त्यामुळे युजर्सला स्मार्टफोनसाठी यापूर्वीपेक्षा आता अधिक सिक्युरिटी मिळणार आहे. मात्र हे अपडेट सध्या काही निवडक युजर्सला उपलब्ध करुन दिले आहे. पण लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाणार आहे.(नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार? तर 12 हजारांहून कमी किंमती मधील 'या' दमदार फोनबद्दल जरुर जाणून घ्या)

Realme 6 Pro साठी जाहीर केले नवे अपडेटची घोषणा कंपनीने त्यांच्या अधिकृत फोरम पेजवर शेअर केले आहे. येथे दिलेल्या नव्या माहितीनुसार, या स्मार्टफोनसाठी RMX2061_11.A.37 नोव्हेंबर ओटीए अपडेट रोलआउट केले आहे. जर तुम्ही Realme 6 pro युजर्स आहात तर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अपडेट पाहू शकता. मात्र ज्यांना अद्याप अपडेट मिळालेले नाही त्यांना मात्र अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.(रियलमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन Realme 7 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च)

या नव्या अपडेटमध्ये युजर्सला काही खास फिचर्स मिळणार आहे. यामध्ये सुपर पॉवर सेविंग मोड आणि ऑटो ब्राइटनेस अॅड केले आहे. त्याचसोबत अपडेट नंतर पोन कॉलिंगचे लेआउट बदलले आहे. सिक्युरिटी अधिक मजबूत करण्यासाठी ऑक्टोंबर 2020 अॅन्ड्रॉइड सिक्युरिटी पॅच सुद्धा जाहीर केला आहे.

Realme 6 Pro  ला मिळालेल्या अपडेटनुसार, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, फोनमध्ये येणारे काही बग्स फिक्स करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून युजर्सला Reject With SMS फिचर मध्ये समस्या येत होती. मात्र ही समस्या आता दूर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सेटिंग्समध्ये स्क्रिनशॉट बटन सुद्धा अपडेट केले आहे. त्याचसोबत युजर्सला फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान येणारी समस्या सुद्धा दूर होणार आहे.