Noise Beads TWS इअरबड्स भारतात लॉन्च, युजर्सला मिळणार 18 तासांचा प्लेबॅक टाइम
Noise Beads (Photo Credits-Twitter)

ओडिओ ब्रँन्ड नॉइस (Noise) यांनी आपले शानदार ईअरबड्स नॉइस बीड्स (Noise Beads) भारतात लॉन्च केले आहेत. हे ईअरबड्स स्टीमलेस डिझाइनसह येतात. यामध्ये टच कंट्रोल आणि दमदार बॅटरी दिली गेली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 18 तासांचा बॅकअप देती आहे. या व्यतिरिक्त युजर्सला ईअरबड्स मध्ये टाइप सी चार्जिंग पोर्ट, आयपीएक्स 5 रेटिंग आणि ब्लूटूथ 5.1 चा सपोर्ट मिळणार आहे.(Noise Buds Prima भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये देणार 42 तासांचा बॅटरी बॅकअप)

नॉइस बीड्स ईअरबड्सची खरी किंमत 3,499 रुपये आहे. परंतु हे ईअपफोन इंडोडक्टरी ऑफर अंतर्गत 1499 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. हे ईअरबड्स ग्रे आणि ब्लॅक रंगात अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु याचा सेल येत्या 24 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.

Tweet:

यामध्ये स्टेबल कनेक्शनसाठी ब्लूटूथ 5.1 सह हायपर सिंक टेक्नॉलॉजी दिली गेली आहे. याच्या ईअरफोनचे वजन 4.5 ग्रॅम आहे. नॉइस बीड्सची बॅटरी सिंगल चार्ज मध्ये 7 तासांची बॅकअप देते. तर चार्जिंग केस 11 तासांची बॅटरी बॅकअप मिळणार आहे. एकूण मिळून ईअरफोनची बॅटरी 18 तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर करते. या व्यतिरिक्त ईअरबड्समध्ये टच कंट्रोलसह गुगल असिस्टंट आणि सिरीचे सपोर्ट ही मिळणार आहे.