Noise Buds Prima भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये देणार 42 तासांचा बॅटरी बॅकअप
Noise Buds Prima (Photo Credits-Twitter)

Noise ने आपले शानदार इअरबड्स Noise Buds Prima भारतात लॉन्च केले आहेत. या इअरफोनसाठी शानदार डिझाइन दिले गेले असून ते न्वाइज कॅसिंलेशन फिचरसह येणार आहेत. यामध्ये दमदार बॅटरी दिली गेली आहे. तर बॅटरी सिंगल चार्जमध्ये 42 तासांची बॅटरी बॅकअप देणार आहे. या व्यतिरिक्त न्वाइज बड्स प्राइमा इअरबड्समध्ये चार मायक्रोफोन्स दिले आहेत.

Noise Buds Prima चार मायक्रोन्ससह येणार आहे. या इअरबड्समध्ये 6mm चे ड्रायव्हर दिले गेले आहेत. जे शानदार साउंड प्रोड्युस करतात. त्याचसोबत न्वाइज कॅसिंलेशनचे फिचर सुद्धा मिळणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला न्वाइज बड्स प्राइमा मध्ये इंस्टाचार्ज तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळणार आहे. त्याच्या मदतीने इअरबड्स 10 मिनिटात चार्ज होत 120 मिनिट्सचा प्लेबॅक मिळणार आहे.(Motorola चा स्वस्त 5G स्मार्टफोन G51 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह ऑफर्स)

Tweet:

न्वाइजने आपल्या लेटेस्ट इअरबड्स मध्ये हायपर सिंक टेक्नॉलॉजी दिली आहे. त्याच्या मदतीने युजर्सला इअरफोन सहज स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहेत. या व्यतिरिक्त न्वाइज बड्स प्राइम मध्ये सिरी आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट ही मिळणार आहे. तर इअरफोनला IPX5 ची रेटिंग मिळाली आहे.

Noise Buds Prima ची किंमत फ्लिपकार्टवर दिली गेली आहे. त्यानुसार हे इअरबड्स ब्लॅक, व्हाइट आणि गोल्ड रंगात फक्त 1799 रुपयात खरेदी करता येणार आहेत. याची विक्री येत्या 14 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.