Paytm Layoffs: पेटीएम कर्मचारी कपातीच्या बातम्या निराधार; प्रवीण शर्मा यांनी नाकारला बिझनेस सेगमेंटमध्ये 25-50 टक्के नोकर कपातीसंदर्भातील अहवाल
Paytm Layoffs | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Paytm Layoffs: पेटीएम (Paytm) ची मूळ कंपनी 'वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड' (One 97 Communication Limited) ने त्या सर्व मीडिया रिपोर्ट्सचे खंडन केले आहे. ज्यात दावा करण्यात आला होता की, कंपनी वेगवेगळ्या व्यावसायिक विभागांमधील सुमारे 25-50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. कंपनीने ही बातमी दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, पुनर्रचना आणि कार्यप्रदर्शन संबंधित समायोजन चुकीच्या पद्धतीने छाटणी म्हणून मानले गेले आहे. पेटीएम आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्थिरतेशी तडजोड न करता वाढीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी वचनबद्ध आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, पेटीएम वार्षिक कामगिरी पुनरावलोकनाचा भाग म्हणून वेगवेगळ्या विभागांमध्ये टाळेबंदी करणार आहे. याशिवाय, पेटीएम एआय-चालित ऑटोमेशनवर भर देत आहे. यामुळे नोकऱ्याही कमी होऊ शकतात.

पेटीएम बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. प्रवीण यांनी 23 मार्च रोजी कंपनीकडे राजीनामा सादर केला असला तरी ते 31 मार्चपर्यंत कंपनीतच राहणार आहेत. One97 कम्युनिकेशनने आपल्या फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. पेटीएममध्ये येण्यापूर्वी प्रवीण शर्मा जवळपास 9 वर्षे गुगलमध्ये होते. त्यानंतर शर्मा यांनी भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेश (APAC) मध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली. (हेही वाचा -Paytm Crisis: पेटीएमला मोठा दिलासा; NPCI कडून मिळाला युपीआयसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरचा परवाना)

पीपीबीएलच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी राजीनामा दिला होता.

यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) च्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी बोर्डाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, One97 कम्युनिकेशन्सने म्हटले आहे की, मंजू अग्रवाल यांनी 1 फेब्रुवारी रोजी वैयक्तिक कारणांमुळे बोर्डाचा राजीनामा दिला आहे. याचा कंपनीच्या कामकाजावर किंवा व्यवसायावर परिणाम होणार नाही.