नववर्ष स्वागतासाठी YouTube वर व्हर्च्युअल पार्टीचे आयोजन; Hello 2021 India मध्ये बॉलिवूड कलाकारही होणार सहभागी
YouTube (Photo Credits: Getty Imgaes)

गुगल ने नववर्ष (New Year) स्वागतासाठी व्हर्च्युअल पार्टी (Virtual Party) आयोजित केली आहे. युट्युबवर (YouTube) आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीसाठी  गुगलने भारतीय युजर्संना आमंत्रित केले आहे. 'हॅलो 2021 इंडिया' (Hello 2021 India) या नावाने हा कार्यक्रम होणार आहे. या पार्टीचे 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता प्रीमियर होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff), रॅपर बादशाह (Badshah) आणि गायिका जोनिका गांधी (Jonita Gandhi) यांसारखे सेलिब्रिटी परफॉर्म करणार असून निवेदन कॉमेडियन जाकिर खान करणार आहेत. विशेष म्हणजे गुगलने एक पार्टी पॉपर आयकॉन देखील लॉन्च केला आहे.

गुगलवर नवे सर्च पेज ओपन करुन त्यामधील  'I’m Feeling Lucky'च्या खालील लिंक वर क्लिक करुन युट्युब वरील नवीन वर्षाच्या व्हर्च्युअल पार्टीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही युट्युबच्या नवीन वर्षाच्या व्हर्च्युअल पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येईल. युट्युब वर 21 हॅलो 2021 इंडिया सर्च करुन तुम्ही थेट या लिंकवर पोहचू शकता.

व्हर्च्युअल न्यू ईयर ईव्ह ची पार्टी YouTube Originals द्वारा प्रस्तूत करण्यात आली आहे. यात गायिका आस्था गिल, बेनी दयाल, आणि अकासा, संगीत बँड थायकुडम पुल, आणि अभिनेत्री अलाया एफ हे देखील या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. (Year Ender 2020 YouTube: यंदाच्या वर्षात युट्युब वरील 'हे' आहेत ट्रेन्डिंग व्हिडिओ, भारतीय युजर्सकडून Chocolate Cake ची रेसिपी सर्वाधिक सर्च)

तुम्ही सेट रिमायंडर पॉपअप वर टॅप करुन व्हर्चुयअल इव्हेंटसाठी रिमायंडर सेट करु शकता. YouTube लिंक वर क्लिक करुन तुम्ही हा शो पाहू शकता. कार्यक्रमापूर्वी युट्युब चॅटचा पर्याय सुरु होईल.