Netflix (File Image)

भारतात सध्या वेबसिरिज पासून ते चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेटफिक्सच्या (Netflix) युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मोबाईल ओन्ली प्लॅन (Mobile Only Plan) कंपनीकडून लॉन्च करण्यात आले होते. भारतात ही कंपनी उत्तम बिझनेस करत असून लवकरच आता तीन नवे प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नेटफ्लिक्स लॉन्ग टर्म प्लॅन्सवर काम करत आहे. हे प्लॅन तीन महिने, सहा महिने आणि 12 महिन्यांसाठी असणार आहे. या नव्या प्लॅनची अद्याप टेस्टिंग केली जात आहे. मात्र सध्या काही युजर्सला या नव्या प्लॅनचा ऑप्शन दाखवला जात आहे.

आज तक यांना दिलेल्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सचे प्रवक्ते यांनी असे म्हटले आहे की, हे नवे प्लॅन सध्या टेस्टिंग केले जात आहेत. मात्र हे प्लॅन तेव्हाच लॉन्च केले जातील ज्यावेळी जास्त लोकांसाठी हे उपयोगी ठरतील. कंपनीचे असे मानणे आहे की, काही ग्राहकांना महिन्याच्या सब्सक्रिप्शनसाठी आकारण्यात येणारे पैसे एकदाच भरणे योग्य वाटते. 199 रुपयांच्या मोबाईल ओन्ली प्लॅन साखरे हे लॉन्ग टर्म प्लॅन सर्वात प्रथम भारतात टेस्ट केले जात आहेत. या प्लॅनची अशी खासियत असणार आहे की याच्या माध्यामातून 20 ते 50 टक्के पैशांची बचत होणार आहे. मोबाईल ओन्ली प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास भारतात हे प्लॅन 199 रुपयांपासून सुरु आहेत.

नेटफ्लिक्सच्या लॉन्ग टर्म असणाऱ्या प्लॅनची सुरुवाती किंमत 1919 रुपये आहे. मात्र या प्लॅनची सध्या टेस्टिंग सुरु आहे. तर 6 महिन्यांच्या प्लॅनसाठी 3359 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 4799 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. सध्याच्या प्लॅनसोबत याची तुलना केली असता त्याचे दर 50 टक्के कमी आहेत. मात्र नव्या प्लॅनबद्दल कंपनी कधी अधिकृत घोषणा करणार हे स्पष्ट झालेले नाही. नेटफ्लिक्सच्या मते टेस्टिंग म्हणजे हे प्लॅन जरुर लॉन्च केले जाणार आहेत. त्यामुळे जर कंपनीला असे वाटले की, युजर्सला हे प्लॅन आवडत नसतील तर ते प्लॅन टेस्टिंग नंतर बंद करण्यात येणार आहेत.