दर्जेदार वेबसीरिजचं (Web Series) वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणारं Netflix तर्फे भारतात एक किफायतशीर प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. Mobile-Only असे या सब्स्क्रिप्शन प्लॅनचे नाव असून यामुळे आता प्रेक्षकांना स्वस्तात Netflix And Chill हा पर्याय उपलब्ध होणार आहे. बुधवारी, 17 जुलैला या नेटफ्लिक्स तर्फे याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली, त्यानुसार, भारतातील जास्त लोकसंख्या ही स्मार्टफोन वरून इंटरनेट सुविधांचा अधिक वापर करते. ही बाब लक्षात घेता, नेटफ्लिक्सचे एका महिन्याचे सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी 250 रुपयाच्या प्लॅनची तपासणी केली जात आहे. हा प्लॅन मुख्यतः स्मार्टफोन युजर्ससाठी तयार करण्याचा कंपनीचा विचार आहे.
प्राप्त माहितीनुसार, नेटफ्लिक्सला कमी सब्स्क्रिप्शन झालेल्या नुकसानामागे त्यांचे महाग दर हे कारण समोर आले होते. नेटफ्लिक्स वर तीन महिन्यांसाठी अनुक्रमे 500 . 650 आणि 800 रुपयांची सब्स्क्रिप्शन फी ग्राहकांना भरावी लागते. तर याउलट अन्य स्पर्धक कंपन्यांचे दर बरेच स्वस्त आहेत. हॉटस्टारची एका महिन्याची सुविधा अवघ्या 299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर ऍमेझॉन प्राईम मेंबरशिप द्वारे ग्राहकांना व्हिडीओ आणि म्युजिक सर्व्हिसेसचा एकत्रित आनंद घेता येतो. त्यामुळे या स्पर्धक कंपन्यांना मागे टाकण्यासाठी नेटफ्लिक्स आता या सवलतीच्या दराचा प्लॅन तयार करण्यावर भर देत आहे. Netflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या
दरम्यान, भारतातील विस्तृत वापर पाहता नेटफ्लिक्स भारतीयांची आवड जपणाऱ्या सीरीज आणू पाहत आहे, मागील वर्षी सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज या सिरीज हिट ठरल्या होत्या. याच सेक्रेड गेम्स चा दुसरा सीझन ही येत्या 15 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे.