 
                                                                 सध्या भारतात मनोरंजाच्या सर्विस मध्ये Netflix चे नाव आघाडीवर आहे. 2016 रोजी नेटफ्लिक्सने भारतात आपली सेवा युजर्ससाठी सुरु केली. तर नेटफ्लिक्सवरील Sacred Games ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याने त्यानंतर काही दिवसातच नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली. नेटफ्लिक्सवरील काही वेवसीरिज या भारतात शूट केल्या जात आहेत.
तसेच नेटफ्लिक्सने 11 ऑरिजनल सीरिजसह भारतात 22 ऑरिजनल चित्रपटांची घोषणा केली आहे. मात्र नेटफ्लिक्स वापरण्यासाठी युजर्सला त्याचे सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही नेटफ्लिक्स वापरत असलास तर या 5 भन्नाट फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या.
1) ऑफलाईन (Offline):
नेटफ्लिक्समधील ऑफलाईन फिचर्स बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या वेळेस विमानातून प्रवास करत असल्यास तेथे इंटरनेट सुरु होत नाही. अशा वेळी तुम्हाला नेटफ्लिक्सवरील ऑफलाईन हे फिचर्स उपयोगी पडले. तर तुमच्या आवडीची कोणतीही वेबसीरिज किंवा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन डाऊनलोड करुन ऑफलाईन पाहू शकता.
2) सगेशन्स (Suggations):
नेटफ्लिक्स युजर्सला त्याच्या आवडीनुसार एखाद्या वेबसीरिजचे ऑप्शन दिले जाते. जेणेकरुन तुम्ही यापूर्वी नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या वेबसीरिजच्या कथेच्या अनुरुप काही वेबसीरिजचे सगेशन्स तुम्हाला दाखवले जाते. त्याचसोबत नव्याने येणाऱ्या कार्यक्रमांबद्दलसु्द्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते.
3) इन्स्टग्राम शेअरिंग (Instagram Sharing):
सध्या सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे युजर्स फार प्रमाणात आहेत. तर आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहत असलेल्या वेबसीरिजचे नाव तुम्ही तुमच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये पोस्ट करु शकता.
4) युजर्स प्रोफाइल (User Profile):
नेटफ्लिक्सवर युजर्स आपले 5 वेगवेगळे पाच प्रोफाइल तयार करु शकतो. त्यामध्ये लहान मुलांसाठी किड्स प्रोफाइलचे सुद्धा ऑप्शन देण्यात आले आहे.
5)सब्सक्रिप्शन (subscription):
भारतात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन 500 रुपयांपासून सुरु आहे. एका महिन्यासाठी युजर्सला 500 रुपये द्यावे लागतात. या सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून युजर्स अनलिमिटेड सीरिड, चित्रपट, कॉमेडी आणि डॉक्युमेंट्रिज पाहायला मिळतात. तर दोन युजर्ससाठी 650 रुपये मोजावे लागतात.
(Sacred games Season 2: सेक्रेड गेम्स साठी प्रेक्षकांना पाहावी लागणार वाट, Netflixने दिले हे कारण)
सध्या नेटफ्लिक्सवर वेबसिरिजच्या माध्यमातून विविध घटनांवर आधारित नव्या कथा पाहायला मिळतात. तर 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये कल्की कोचीन ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नवाजुद्दीन आणि सैफ ची जुगलबंदी या ही वेळेस प्रेक्षकांवर छाप पडण्यास यशस्वी होईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
