Sacred games Season 2: सेक्रेड गेम्स साठी प्रेक्षकांना पाहावी लागणार वाट, Netflixने दिले हे कारण
सेक्रेट गेम्स 2 टीझर Photo Credits youtube

डिजिटल मनोरंजनाच्या रिंगणात एका पेक्षा एक ताकदवान वेबसिरीज (Webseries) मागोमाग प्रदर्शित होत असल्याने चाहत्यांची चंगळ होत आहे. एखाद्या वेबसीरिजचा भाग प्रदर्शित होण्याच्या आधी व नंतर सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगताना पाहायला मिळतात. अशीच एक बहुचर्चित आणि बहू प्रतिक्षीत वेबसिरीज म्हणजे 'सेक्रेड गेम्स 2' (Sacred Games Season 2). अवघ्या आठ भागांची ही सीरिज संपताना प्रेक्षकांना नेमकं पुढे काय घडणार ही उत्सुकता लावून गेली होती, काही दिवसांपूर्वी या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार अशी घोषणा झाल्यावर पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आता या फॅन्सना नवीन सीजन साठी अजून काही दिवस थांबावे लागणार असल्याचे दिसून येतेय.

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स मधून सैफ अलि खान (Saif Ali Khan)  नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) , राधिका आपटे( Radhika Aapte) ,जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्या हटके टीमने वेबविश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला होता.सूत्रांच्या माहितीनुसार 'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीजन एप्रिल मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता मात्र नेटफ्लिक्स द्वारे करण्यात येणाऱ्या स्ट्रीमिंग मधील दिरंगाई मुळे आताही सीरिज जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होऊ शकते.

MENSXP च्या माहितीनुसार सेक्रेड गेम्सचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे मात्र हे सीजन पहिल्या सिजनच्या तुलनेत कमी ताकदीचे आहे असे मत नेटफ्लिक्सने (Netfllix) मांडले आहे, आणि त्यामुळेच या सिजनच्या स्ट्रीमिंग मध्ये उशीर होत असून परिणामी फॅन्सना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. Sacred Games Season 2 टीझर : नेटफ्लिक्सवर पुन्हा रंगणार गणेश गायतोंडेचा थरार

 

View this post on Instagram

 

A cop, a gangster and a revolver walk into a bunker...

A post shared by Sacred Games (@sacredgames_tv) on

'सेक्रेड गेम्स 2' मध्ये कल्की कोचीन ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नवाजुद्दीन आणि सैफ ची जुगलबंदी या ही वेळेस प्रेक्षकांवर छाप पडण्यास यशस्वी होईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.