Netflix: नेटफ्लिक्सने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत अनेक वापरकर्ते नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करून या OTT प्लॅटफॉर्मचा फायदा घेत होते, पण आता असे होणार नाही. जगातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Netflix ने आधीच 2023 च्या पहिल्या तिमाहीपासून पासवर्ड शेअरिंग वैशिष्ट्य बंद करण्याची घोषणा केली आहे. OTT कंपनीने नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. युजर्सनी नेटफ्लिक्स अकाउंट शेअर केल्यामुळे कंपनीच्या कमाईत घट झाल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. नेटफ्लिक्सने गेल्या वर्षाच्या अखेरीस पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्याची माहिती दिली होती.
अनेक वापरकर्ते त्यांचे पासवर्ड इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करतात. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत होते. कंपनी आता पासवर्ड शेअरिंग बंद करत आहे जेणेकरून त्यांना प्रत्येक वापरकर्त्याकडून पैसे मिळतील.
जाणून घ्या नवीन नियम,
Netflix FAQ पृष्ठावरील पोस्टनुसार, Netflix खाते आता फक्त एकाच घरात राहणारे लोकच ऍक्सेस करू शकतात. डिव्हाइसेस प्राथमिक स्थानाशी जोडलेले आहेत याची खात्री करण्यासाठी, Netflix वापरकर्त्यांना दर 31 दिवसांनी एकदा Wi-Fi शी कनेक्ट करण्यास सांगेल. नियमानुसार, जे लोक एकाच पत्त्यावर राहत नाहीत त्यांना Netflix चा वापर करण्यासाठी त्यांचे स्वतःचे खाते वापरावे लागेल.