Netflix (File Image)

जर तुम्ही ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज, चित्रपट, शॉर्ट फिल्मसह त्या संदर्भातील काही गोष्टी पाहत असल्यास तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण नेटफ्लिक्सवर (Netflix) आज रात्री 12 वाजल्यापासून सर्व युजर्सला ते फ्री मध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तर नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन हे दोन दिवसांसाठी असणार असून येत्या 5 आणि 6 डिसेंबरला त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. नेटफ्लिक्सने या संदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. StreameFest च्या अंतर्गत लोकांना दोन दिवस फ्री मध्ये नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(WhatsApp OTP Scam काय आहे? त्यापासून सुरक्षित कसे राहाल?)

नेटफ्लिक्सकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, या ऑफरमध्ये युजर्सला नेटफ्लिक्सवरील सर्व कंन्टेट एक्सेस करता येणार आहेत. म्हणजेच नेटफ्लिक्स प्रीमियमच फिचर्सचा लाभ सर्व युजर्सला मोफत पद्धतीने दोन दिवस घेता येणार आहे. तर मुख्य गोष्ट म्हणजे स्ट्रिम फेस्ट फक्त ज्या लोकांसाठी असणार आहे जे नेटफ्लिक्सचे सब्सक्राइबर नाही आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी आधीच नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेतले आहे त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही आहे.

मोफत पद्धतीने नेटफ्लिक्सचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला त्याचे अकाउंट बनावावे लागणार आहे. यासाठी तुम्ही अॅप डाऊनलोड करु शकता किंवा Netflix.com/streamfest या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. ज्यावेळी अॅप डाऊनलोड कराल तेव्हा तेथे तुम्हाला Sing Up करावे लागणार आहे. साइन अप वेळी फोन क्रमांक, ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागणार आहे.(PUBG Mobile India लवकरच होणार लॉन्च; कंपनीने शेअर केला टीझर Watch Video)

अकाउंट तयार झाल्यानंतर वेबसाईट किंवा अॅपवर दोन दिवस तुम्हाला नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या फेस्टची खासियत अशी की त्याचे सब्सक्रिप्शन युजर्सला टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये ही एक्सेस करता येणार आहे. लक्षात असू द्या की फेस दरम्यान फक्त SD कंटेंटच पहायला मिळणार आहे. म्हणजेच HD किंवा Full HD कंटेंट पाहता येणार नाही आहे.

मात्र एक उत्तम गोष्ट म्हणजे तुम्हाला नेटफ्लिक्सचे फ्री मध्ये दोन दिवसांसाठी सब्सक्रिप्शन मिळणार आहे. परंतु त्यावेळी तुम्हाला बँकेचे डिटेल्स देणे अनिवार्य नसणार आहे. तर याआधी नेटफ्लिक्सकडून युजर्सला एका महिन्यासाठी फ्री मध्ये त्याचे सब्सक्रिप्शन दिले जात होती. मात्र ही सुविधा आता फ्री ट्रायल्स बंद करण्यात आली आहे.