How to Make Account on Netflix: नेटफ्लिक्सवर स्वत:चे अकाउंट बनविण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स
नेटफ्लिक्स (फोटो सौजन्य- Pixabay)

सध्या संपूर्ण जग हे डिजिटलमय (Digitalised) झाले असून त्यात बरेच जणांसाठी OTT प्लॅटफॉर्म जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. घरबसल्या, प्रवासादरम्यान तुमच्या आवडत्या वेबसीरिज, चित्रपट (Movies) तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहू शकता. यात Netflix हा OTT प्लॅटफॉर्म प्रचंड लोकप्रिय झाला असून या नंतर अनेक OTT प्लॅटफॉर्म्स भारतीय बाजारात आले. मात्र सर्वात प्रीमियम मानला जाणारा नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मला अनेकांनी पसंती दर्शवली. मात्र अनेकांना यावर आपले अकाउंट कसे बनवायचे याबाबत फारशी माहिती नसल्याने या वेबसीरिज (Webseries) पाहण्यापासून मुकावे लागले.

अशा लोकांनी आता बिल्कुल चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सहज पद्धतीने Netflix वर स्वत:चे अकाउंट बनवू शकाल.

1. सर्वात आधी https://www.netflix.com/in/ या संकेतस्थळाला भेट द्या. जेथे तुम्हाला Get Started बटन दिसेल. येथे रिक्त जागेमध्ये जाऊन तुमचा ईमेल आयडी टाकावा लागेल आणि Get Started बटनावर क्लिक करावे लागेल.

2. पासवर्ड बनवा

त्यानंतर तुम्ही नेक्स पेजवर जाल. यावर तुम्हाला Netflix अकाउंटचा पासरव्ड क्रिएट करावा लागेल. पासवर्ड क्रिएट करण्यासाठू तुम्हाला पुन्हा नेक्स्ट पेजवर जावे लागेल. त्यासाठी Continue वर क्लिक वा टॅप करावा लागेल. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा Continue वर क्लिक करुन नेक्स्ट पेजवर जावे लागेल. Netflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या

3. प्लान निवडा

यानंतर आलेल्या पेजवर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार प्लान निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजनवर नेईल.

4. यावर अकाउंट बनवलेल्या युजर्सला पहिले 30 दिवस मोफत ट्रायल मिळेल.

5. फ्री मेंबरशिप पेमेंट सेटअप

मोफत ट्रायल घेणा-या युजर्सला यात आपले नाव, पत्ता आणि क्रेडिट और डेबिट कार्डची माहिती द्यावी लागते. पुढील पेजवर जाण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा Continue बटणावर क्लिक करावे लागेल.

6. मेंबरशिप पूर्ण

पुढील पेजवर जाता क्षणीच तुम्ही टाकलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही ते तपासायला मिळेल. त्यानंतर Check बॉक्स agree वर क्लिक करुन तुमची मेंबरशिप सुरु करावी लागेल.

या पद्धतीने तुम्ही Netflix वर स्वत:चे अकाउंट बनवून नेटफ्लिक्सचे सदस्य व्हाल. स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्हीवर अकाउंट बनविण्यासाठी तुम्हाला याच पद्धतीने अकाउंट बनवावे लागेल.