नेटफ्लिक्स इंडियाने (Netflix India) दोन दिवसासाठी स्ट्रिमफेस्ट (Streamfest) सुरु केला आहे. या स्ट्रिमफेस्ट अंतर्गत कुठल्याही प्रकारचे पैसे न भरता युजर्स नेटफ्लिक्सवरील सर्व शोज मोफत पाहू शकतात. नेटफ्लिक्सच्या या स्ट्रिमफेस्टला आज एक अडथळा निर्माण झाला आहे. याची माहिती नेटफ्लिक्सने सोशल मीडियाद्वारे दिली असून त्यावर तोगडा काढण्यात आल्याचेही सांगितले आहे. नेटफ्लिक्सच्या वेबसाईटवर सध्या युजर्संना “StreamFest is at Capacity” असा मेसेज दिसत आहे. याचा अर्थ युजर्सच्या प्रचंड प्रतिसादामुळे नेटफ्लिक्सची स्ट्रिमिंग कॅपेसिटी संपली असून युजर्संना या स्ट्रिमिंगचा उपभोग घेता येणार नाही. या अडथळ्यानंतर नेटफ्लिसने युजर्सची माफी न मागता युजर्संना नवा उपाय शोधून दिला आहे. ज्या युजर्संना हा मेसेज दिसला आहे त्या युजर्स अजून दोन दिवसांसाठी नेटफ्लिक्सवरील शोज मोफत पाहता येणार आहेत. दरम्यान, ही अनेक युजर्ससाठी खुशखबर आहे. (नेटफ्लिक्स सर्वांसाठी फ्री मध्ये होणार उपलब्ध, जाणून घ्या कशा पद्धतीने याचा लाभ घेता येईल)
नेटफ्लिक्सने या फेस्टची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरु होती. नेटफ्लिक्स हे अत्यंत लोकप्रिय स्ट्रिमिंग अॅप असल्यामुळे या फेस्टला उदंड प्रतिसाद मिळणे स्वाभाविकच होते. ज्या युजर्संना “StreamFest is at capacity” हा मेसेज दिसला आहे अशा युजर्स कडून नेटफ्लिक्स ईमेल आयडी आणि फोन नंबर मागत आहे. जेणेकरुन त्यांना अजून दोन दिवसांचे फ्री स्ट्रिमिंग देणे शक्य होईल. त्यामुळे यंदाची संधी हुकलेल्या युजर्संना नेटफ्लिक्सचा फ्री लाभ घेण्याची दुसरी संधी प्राप्त होणार आहे. (Netflix StreamFest Funny Memes & Jokes: फ्री नेटफ्लिक्स शो वर युजर्सच्या उड्या; भन्नाट मीम्स आणि जोक्स व्हायरल)
नेटफ्लिक्स इंडिया ट्विट:
Due to the overwhelming response to StreamFest, you might be seeing the message “StreamFest is at capacity”.
You could give us your email ID or phone number at https://t.co/pcAEKoyThA and we'll let you know within the week when you can get your two days of free Netflix.
— Netflix India (@NetflixIndia) December 5, 2020
नेटफ्लिक्सने सध्याच्या काळात काही इंडियन वेबसिरीज सुरु केल्या असून सेक्रेड गेम्स, दिल्ली क्राईम, बार्ड ऑफ ब्लड यांसारख्या वेबसिरीज अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मनी आईस्ट, रोझार्क, ब्रेकींग बॅड आणि नारकोस या त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध वेबसिरीज आहेत.