Netflix StreamFest Funny Memes & Jokes: फ्री नेटफ्लिक्स शो वर युजर्सच्या उड्या; भन्नाट मीम्स आणि जोक्स व्हायरल

फ्री असल्याने आज दोन दिवस युजर्सच्या नेटफ्लिक्सवर उड्या पडतील, तर काहींवर यामुळे काहीच परिणाम होणार नाही. यावरुन भन्नाट मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Netflix StreamFest Funny Memes & Jokes: फ्री नेटफ्लिक्स शो वर युजर्सच्या उड्या; भन्नाट मीम्स आणि जोक्स व्हायरल
Netflix StreamFest Funny Memes (Photo Credits: @Towqeermadni09/ @sharmajikaputr/ Twitter)

Netflix चा StreamFest काल रात्री 12 पासून सुरु झाला. हा दोन दिवसांचा इव्हेंट असणार आहे. 5 आणि 6 डिसेंबर या दोन दिवसांत नेटफ्लिक्स सर्वांसाठी फ्री असणार आहे. कायम पैसे भरुनच शो पाहावे लागत असल्याने फ्री नेटफ्लिक्स शो पाहण्यास तब्बल दोन दिवस उपलब्ध झाल्याने युजर्सने मीम्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज दोन दिवस युजर्सच्या नेटफ्लिक्सवर उड्या पडतील, तर काहींवर यामुळे काहीच परिणाम होणार नाही. यावरुन भन्नाट मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Netflix हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रिमिंग अॅप आहे. युजर्संना आकर्षिक करण्यासाठी कंपनीकडून सातत्याने विविध ऑफर्स सादर केल्या सर्वात कमी किंमतीचा स्ट्रिमिंग प्लॅन 199 रुपयांचा आहे. दरम्यान, या अॅपवर तुम्ही केवळ पैसे भरुनच शोज पाहू शकता. त्यामुळे नेटफिक्सद्वारे स्वस्त आणि भारतीय ग्राहकांना सुटेबल असे प्लॅन्स जाहीर केले जातात. मात्र StreamFest दरम्यान तुम्ही नेटफ्लिक्स वरील सर्व शो अगदी मोफत पाहू शकता. ही संधी 5 आणि 6 डिसेंबर रोजी युजर्संना उपलब्ध झाली आहे.

मीम्स आणि जोक्स!

दरम्यान, सध्या मीम्सचा ट्रेंड आहे. त्यामुळे अनेक लहान-सहान, गंभीर-मजेशीर गोष्टींवर मीम्स व्हायरल होत असतात. तुम्ही देखील रिलेटेड मीम्स किंवा जोक्स तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत शेअर करुन या धम्माल, मस्तीत सहभागी होऊ शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2020 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).