Google Pay, Phone Pay सारख्या UPI App वर Transaction Limit, एका दिवसात फक्त लिमिटेड पेमेंट करण्यास मुभा; RBI घेणार मोठा निर्णय
Google Pay (Photo Credits-Twitter)

UPI डिजिटल पाइपलाइन (UPI Digital Pipeline) चालवणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation India) ची सध्या एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा सुरु आहे. यूपीआयद्वारे (UPI) केल्या जाणाऱ्या पेमेंटवर (Payment) आता व्हॉलूम कॅप (Volume Cap) बसवण्यात येणार आहे. या व्हॉल्यूम कॅपनुसार आता यूपीआद्वारे म्हणजेच गुगल पे (Google Pay) किंवा फोनपे (Phone Pay) सारख्या थर्ड पार्टी अपद्वारे पेमेंट (Third Party) करायचे असल्यास त्याची मर्यादा ठरवल्या जाणार आहे. म्हणजे  दिवसाला प्रत्येक गुगल पे किंवा फोन पे धारकांना या अप्सद्वारे एका ठरवलेल्या किंमती प्रमाणे मर्यादित पेमेंट करता येणार आहे. तरी आरबीआय कडून येत्या ३० नोव्हेंबर पासून व्हॉलूम कॅपचा निर्णय लागू करण्यात येणार होता. पण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय पुढे ठकलण्याची मागणी केली आहे. म्हणजेचं ३० नोव्हेंबर ऐवजी ३१ डिसेंबर पासून व्हॉलूम कॅपचा निर्णय लागू करावा अशी मागणी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून करण्यात आली आहे.

 

सध्या फोन पे किंवा गुगल पे पेमेंटवर कुठल्याही प्रकारची व्हॉलूम कॅप नाही.  या अपद्वारे ट्रान्जेक्शन करणारे विना कुठल्या मर्यादेशीवाय पेमेंट करु शकतात. पण आरबीआयने व्हॉलूम कॅप लागू केल्यास फोन पे किंवा गुगल पे पेमेंटवर मर्यादा लागू होतील. NPCI ने थर्ड-पार्टी अॅप प्रोव्हायडर (TPAP) साठी 30 टक्के व्हॉल्यूम कॅप प्रस्तावित केला होता. तर या प्रस्तावाची अंमलबजावनी येत्या काही दिवसात म्हणजेच ३० नोव्हेंबरपासून होणार की ३० डिसेंबर पासून हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- New Facebook Update: फेसबूकमध्ये येणार नवा अपडेट, प्रोफाइलवरुन हटवण्यात येणार 'या' महत्वाच्या गोष्टी)

 

सर्व पैलूंवर व्यापक विचार करण्यासाठी आरबीआयकडून एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत एनपीसीआयच्या अधिकारी, अर्थ मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. तरी या बैठकी दरम्यान व्हॉल्युम कॅपचा निर्णय पुढे ठकल्यान्याबाबात कुठलाही निर्णय घेण्यात आयला नाही अशी माहिती मिळाली आहे.NPCI ला मुदत वाढवण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे कडून निवेदने देण्यात आली आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तरी येणाऱअया पुढील काही दिवसात तुमच्या गुगल पे किंवा फोन पे पेमेंटवर मर्यादा लागू होईल ही शक्यता नाकारता येणार नाही.